Homeताज्या बातम्यालोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मानवतेचे आणि क्रांतीचे प्रतीक - रतनलाल सोनग्रा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मानवतेचे आणि क्रांतीचे प्रतीक – रतनलाल सोनग्रा

“क्रांतीपुत्र अण्णा भाऊ साहित्यिकांचा साहित्यिक” या महाचर्चातून उलगडला अण्णा भाऊंचा जीवनप्रवास*

शाहीर नंदेश उमाप, अभिनेत्री, रुक्मिणी सुतार, धर्मेंद्र पाटील अण्णा भाऊ साठे स्मृती पुरस्काराने सन्मानित

पुणे – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ५६ व्या स्मृति दिनाच्या निमित्ताने श्रमिक पत्रकार भवन, येथील सभागृहात झोपडपट्टी सुरक्षा दल व महाराष्ट्र कामगार सुरक्षा दल यांच्या वतीने “क्रांतीपुत्र अण्णा भाऊ साहित्यिकांचा साहित्यिक” या विषयावर महाचर्चा करण्यात आली. या प्रसंगी महाचर्चेचे उद्घाटन मा. आमदार लहू कानडे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा होते. या महाचर्चात जेष्ठ विचारवंत सुरेश दाभाडे, बजरंग कोरडे, अशोक घायाळे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट हे होते.

तसेच या कार्यक्रमात अण्णा भाऊंचे स्मरण ठेवून महाराष्ट्राचे लोक कलावंत सिनेपार्श्वगायक शाहीर नंदेश उमाप तसेच “देवमाणूस” या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री, रुक्मिणी सुतार, प्राणी मित्र धर्मेंद्र पाटील, दलित चळवळीतील अभ्यासू विचारवंत प्राचार्य अरुण गाडे, पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अविनाश गोडबोले यांना अण्णा भाऊ साठे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सोनग्रा म्हणाले की समाजात वावरताना माणसांनी माणसासारखे वागावे. जातिवादाच्या चौकटीतून बाहेर पडून समाजाचा आणि स्वतःचा उद्धार करावा. अनिष्ट चालीरितींना मूठमाती द्याला हवी. घराच्या बाहेर पडताना भारतीय म्हणून बाहेर पडा. स्वतःची जात, धर्म प्रत्येकाने स्वतःपुरताच ठेवावा. शासनाचे सर्व कायदे सर्वांना समान आहेत. सर्वांनी त्याचा आदर करावा. स्वतःच्या अस्मितेवर आलेली काजळी दूर करावी. कायद्यामध्ये, माणसांमध्ये मी भेदाभेद करणार नाही असा निर्धार केला पाहिजे. या देशात धर्मनिरपेक्षतेचा टिकली पाहिजे. राजकिय नैतिकता, टिकली पाहिजे त्याशिवाय समाजवादी भारत तयार होणार आहे.

कानडे म्हणाले की मराठी माणसाला या मराठी मातीला तसेच मराठी साहित्यिकांना, मराठी राजकारण्यांनी अण्णा भाऊंचा योग्य तो अभ्यास केलेला आहे ? अण्णाभाऊंची कथांचा महासागर लिहिलेला आहे. अण्णांच्या असंख्य कथा आहेत आणि प्रत्येक कथा १० ते १२ पानाची आहे. अन्नाची कथा कधी फसलेली नाही.

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ गायकवाड यांनी केले तर आभार भगवानराव वैराट यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

error: Content is protected !!