Homeताज्या बातम्यापोलिस असल्याची बतावणी करून व्यावसायिकांना गंडा; तरुणाला अटक...

पोलिस असल्याची बतावणी करून व्यावसायिकांना गंडा; तरुणाला अटक…

पुणे : पोलिस असल्याची बतावणी करून दुकानदारांकडून विविध वस्तू खरेदी केल्या. त्याचे पैसे न देता पेमेंट ऑनलाइन पाठवल्याचे स्क्रिन शाॅट दाखवून फसवणूक केली. याप्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली.

नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात डिसेंबर २०२३ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. 

अमोल आबासाहेब कायगुडे (३३, रा. सांगवी, मूळगाव गेणशवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर), असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुरेशलाल मिस्त्रिलाल खिंवसरा (६२, रा. सांगवी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २४) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेशलाल हे कापड व्यावसायिक आहेत. त्यांचे कापड विक्रीचे दुकान आहे. संशयित अमाेल कायगुडे याने सुरेशलाल यांच्या दुकानातून खरेदी केली. त्यावेळी त्याने पेमेंट न करता मोबाइलमध्ये फोन पे ॲपमध्ये निकनेमच्या जागी दुकानाचे नाव टाकून स्वत:च्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले. त्यानंतर पेमेंट झाले असल्याची स्क्रिन शाॅट तयार करून दाखवून फसवणूक केली. फिर्यादी सुरेशलाल यांच्यासह इतरांचीही त्याने अशाच पद्धतीने फसवणूक करून एकूण १० हजार ३२० रुपयांचा गंडा घातला.

दरम्यान, पोलिसांनी अमोल याला अटक केली. त्यावेळी तो नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरामध्ये दुचाकीवर येऊन क्राइम ब्रान्च नवी सांगवी पोलिस चौकीमधील पोलिस असल्याची बतावणी करत असल्याचे समोर आले. तसेच त्याच्या गाडीवर महाराष्ट्र शासन असे लिहून व पोलिस असल्याचे भासवण्यासाठी पोलिसांचा लोगो व नाव असलेले किचनचा वापर केला. तसेच वेगवेगळ्या दुकानांमधून वेगवेगळ्या वस्तू खरेदी करून दुकानदारांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. पोलिस उपनिरीक्षक किरण कणसे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

मोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका स्वाती निलेश सावंत...

शिरपूरतालुक्यातमतदारयादींचेसखोलपुर्ननिरीक्षणकार्यक्रमसुरू

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक कर्मचारी अन लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्त्वाची शिरपूर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात...

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांची धडाकेबाज कारवाई

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आपल्या तत्पर व परिणामकारक कामगिरीची छाप...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणीचा स्तुत्य उपक्रम; वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करत समाजासमोर घालून...

0
जामनेर (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावातील इलेव्हन स्टार मित्र...

error: Content is protected !!