Homeमहाराष्ट्रविकासकामांवरून आमदार संदीप क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित आमनेसामने

विकासकामांवरून आमदार संदीप क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित आमनेसामने

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित आणि बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील संघर्ष नव्या टप्प्यात पोहोचला आहे. विकासकामांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीवरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा ‘क्षीरसागर विरुद्ध पंडित’ असा संघर्ष चर्चेचा विषय ठरला आहे.

गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड आणि गेवराईमधील 11 विकासकामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तीव्र आक्षेप घेतला. बीड मतदारसंघातील विकासकामांमध्ये हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीड मतदारसंघ हा माझा आहे. दोन वेळा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले आहे. विकासाच्या नावाखाली माझ्या मतदारसंघातील योजना दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न झाला तर मी त्याला विरोध करणारच.”
ते पुढे म्हणाले, “संघर्षाची मला सवय आहे. संघर्ष नसेल तर काम करण्यात मजा येत नाही. बीडच्या विकासाशी तडजोड होऊ देणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

संदीप क्षीरसागर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार विजयसिंह पंडित म्हणाले, “मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेली बैठक ही गेवराई मतदारसंघातील विकासकामांसाठी होती. त्याचबरोबर बीड नगर परिषदेच्या काही प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. माझं बीडवर प्रेम उतू जाण्यापूर्वी बीडकरांचे माझ्यावर प्रेम उतू गेले आहे. बीडकरांनी मला कौल दिला आहे. मग त्या प्रेमाचा काहींना त्रास का होतो?”या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले आहेत. स्थानिक राजकारणात त्यांच्यातील संघर्ष सातत्याने चर्चेत असतो. विकासकामांच्या मुद्द्यावरून आता हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विजयसिंह पंडित यांनी संदीप क्षीरसागर यांच्या कुटुंबावरही अप्रत्यक्ष टीका केली. “तुमचे कुटुंब गेली तीन दशके नगरपालिकेत सत्तेत होते. मग 165 कोटी रुपयांच्या योजनेचे काय झाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.विजयसिंह पंडित यांचा बीड मतदारसंघातील वाढता हस्तक्षेप आणि त्यावर संदीप क्षीरसागर यांची तीव्र प्रतिक्रिया यामुळे बीडच्या राजकारणात नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक आणि विधानसभा राजकारणात या संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!