Homeताज्या बातम्याक्रीडाSunny Phulmali : चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले गोल्डन बाॅय सनी फुलमाळीचे पालकत्व; पुढील...

Sunny Phulmali : चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले गोल्डन बाॅय सनी फुलमाळीचे पालकत्व; पुढील तीन वर्षांसाठी करणार पन्नास हजारांची मदत!

Times of Maharashtra Desk , Pune : बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावणारा, पण लोहगावमधील पालावर राहून संघर्ष करणारा मराठमोळा पैलवान सनी फुलमाळी याच्या आयुष्याला आता मोठा आधार मिळाला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः सनी फुलमाळीचे पालकत्व स्वीकारले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सनीच्या लोहगावमधील पालावर जाऊन त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या स्वत:च्या पगारातून पुढील तीन वर्षांसाठी दरमहा ५० हजार रुपये देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. इतकेच नाही तर लोकसहभागातून घर, सरावासाठी तालीम आणि शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

जिद्द, चिकाटीचे कौतुक आणि मोठी घोषणा

झोपडीत राहून आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या सनीच्या कामगिरीचे कौतुक करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या बळावर सनीने मिळवलेले यश अतिशय कौतुकास्पद आहे. डोक्यावर छप्पर नसतानाही त्याने ही कामगिरी केली आहे.” आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या १७ वर्षांवरील खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेला आहे. मात्र, १७ वर्षांखालील खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळावे, यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिकूल परिस्थितीतून यशाचे शिखर

मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील असलेल्या सनीचा परिवार गेल्या १५ वर्षांपासून लोहगाव परिसरात एका पालावर वास्तव्यास आहे. पैशांअभावी आजोबा आणि वडिलांना कुस्तीची आवड असूनही ती सोडावी लागली होती. पण वडिलांनी आपल्या तिन्ही मुलांना पैलवान बनवण्याचे स्वप्न पाहिले. आर्थिक अडचणींवर मात करत वडिलांनी झोपडीजवळच्या माळरानावर तात्पुरती मातीची तालीम उभारून मुलांचा सराव सुरू केला. सध्या दहावीत शिकणाऱ्या सनीने यापूर्वी महाराष्ट्र चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद आणि राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. आता बहरीनमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने आपल्या संघर्षमय प्रवासाला ऐतिहासिक कलाटणी दिली आहे. चंद्रकांत पाटलांनी पालकत्व स्वीकारल्यामुळे सनीच्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक जिंकण्याच्या स्वप्नाला निश्चितच मोठा आधार मिळाला आहे.

या भेटीवेळी सनीचे प्रशिक्षक वस्ताद सदाशिव राखपसरे, भाजपा क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे, माजी नगरसेवक बॅाबी टिंगरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!