Homeताज्या बातम्याIndia's first ‘Driverless car: ’“इंडिया ऑन ऑटोपायलट” या नव्या युगाची सुरुवात...

India’s first ‘Driverless car: ’“इंडिया ऑन ऑटोपायलट” या नव्या युगाची सुरुवात बेंगळुरूमध्ये तरुणांनी तयार केली ‘ड्रायव्हरलेस कार..

Times of Maharashtra Desk: भारतातील रस्त्यांवर ड्रायव्हरलेस कार येणं ही गोष्ट केवळ विज्ञानकथांमध्ये वाचायला मिळायची, पण आता ती वास्तवात येतेय. बेंगळुरूमध्ये भारताचं भविष्य वेगाने आकार घेताना दिसत आहे. बंगळूर मधील तरुणांनी अशक्य अशी गोष्ट शक्य करून दाखवली आहे.बांगरुळ मध्ये विप्रो,आयआयएससी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) आणि आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या तीन संस्थानी मिळून एक अशी कार तयार केली आहे जी चालकाशिवाय चालते. म्हणजेच ‘ड्रायव्हरलेस कार’.हा प्रोजेक्ट भारताला फक्त विकसित करणारा नसून “इंडिया ऑन ऑटोपायलट” या नव्या युगाची सुरुवात आहे असे म्हणता येईल.

या तिन्ही संस्थानी याप्रोजेक्टला विरिन – विप्रो-आयआयएससी रिसर्च अँड इनोव्हेशन नेटवर्क असे नाव दिले असून या प्रोजेक्टसाठी ६ वर्षांचा कालावधी लागला आहे. या सह वर्षात अनेक चाचण्या घेतल्या नंतर अखेर ही कार आता जनतेसमोर आणण्यात आली आहे. बेंगळुरूमध्ये झालेल्या कार्यक्रमात या कारचं अनावरण करण्यात आले असून सोशल मिडियावर या कारचा व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओत कर स्वतःहून रस्त्यावर चालताना दिसते त्यात कोणताही चालक बसलेला नाही.

विशेष म्हणजे ही कर भारतीय रस्त्यांच्या अनुषंगाने डिझाईन करण्यात आली आहे. आपल्या देशातील गड्डे, अचानक येणारे प्राणी, ट्रॅफिकचं वेडंवाकडं स्वरूप — या सगळ्यांशी सामना करण्यासाठी अत्याधुनिक एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि मशीन लर्निंग वापरण्यात आले आहे. याशिवाय ही कार 5G कनेक्टिव्हिटी, २एक्स (सर्व गोष्टींसाठी वाहन) कम्युनिकेशन आणि कॅमेरा-लिडार सेन्सर्स वापरून रस्त्यावरच्या प्रत्येक हालचालीचा अंदाज घेते.विप्रो आणि आयआयएससी यांच्या संयुक्त संशोधनामुळे भारताने जागतिक तंत्रज्ञानात आपला ठसा उमटवण्याचं मोठं पाऊल टाकलं आहे.यांच्या संयुक्त संशोधनामुळे भारताने जागतिक तंत्रज्ञानात आपला ठसा उमटवण्याचं मोठं पाऊल टाकलं आहे. हे केवळ तंत्रज्ञानाचं प्रदर्शन नाही, तर “भारतात बनवलेले, भारताने चालवलेले” या आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेचं प्रत्यक्ष उदाहरण आहे.

सध्या ही कार प्रोटोटाइप अवस्थेत असून विविध रस्त्यांवर तिची चाचणी सुरू आहे. पुढील काही वर्षांत ही कार भारतीय शहरांमध्ये प्रत्यक्ष वापरासाठी सज्ज होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. तंत्रज्ञानात भारत झपाट्याने प्रगती करतोय, आणि विरिन ही कार त्याचं जिवंत उदाहरण ठरली आहे — कारण आता भारत फक्त चालत नाही, तर स्वतःच चालवतोय !

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!