Homeमहाराष्ट्ररिपोर्टिंगनंतर आता रनिंग; पत्रकारांची मैदानावर एन्ट्री, ‘पत्रकार प्रीमियर लीग 2’चा धमाकेदार शुभारंभ

रिपोर्टिंगनंतर आता रनिंग; पत्रकारांची मैदानावर एन्ट्री, ‘पत्रकार प्रीमियर लीग 2’चा धमाकेदार शुभारंभ

जळगाव ( प्रतिनिधी विनोद पवार ) : समाजाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारे पत्रकार आता मैदानावरही आपली ताकद दाखवणार आहेत. जळगावमध्ये ‘पत्रकार प्रीमियर लीग – पर्व २’ या अनोख्या क्रिकेट स्पर्धेला आजपासून उत्साहात सुरुवात होत आहे. दि. २६ ते २९ मार्च दरम्यान सागर पार्क मैदानावर रंगणाऱ्या या स्पर्धेची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

दररोज बातम्यांच्या धावपळीत व्यस्त असणाऱ्या पत्रकारांना विरंगुळा मिळावा, तसेच त्यांच्यात मैत्री, समन्वय आणि खेळाडूवृत्ती वाढावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत तब्बल २६ संघ सहभागी होत असून, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरही मैदानात उतरून खेळाचा आनंद लुटणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील १४ संघ, शहरातील ५ संघ, संपादकांचा विशेष संघ तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील आणि पोलीस प्रशासनाचे संघ या स्पर्धेत रंगत आणणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता एक सामाजिक एकात्मतेचा उत्सव ठरणार आहे.

स्पर्धेचा शुभारंभ आज सकाळी ७ वाजता होत असून, उद्घाटनासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. चार दिवस चालणाऱ्या या क्रिकेट महोत्सवात खेळाडूंकरिता मोफत चहा व जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रेक्षकांसाठीही कोणतेही प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले नाही.

समारोप सोहळ्यात विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, उत्कृष्ट खेळाडूंनाही सन्मानित केले जाणार आहे. त्यामुळे जळगावकरांसाठी ही स्पर्धा क्रीडा आणि मनोरंजनाचा दुहेरी आनंद देणारी ठरणार आहे.

या अनोख्या क्रिकेट स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी नागरिकांना केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!