Homeक्राईमलोणेरे हत्याकांड प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची मागणी; रामदास आठवले यांच्याकडे निवेदन

लोणेरे हत्याकांड प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची मागणी; रामदास आठवले यांच्याकडे निवेदन

माणगांव( प्रतिनिधी जयेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे घडलेल्या कु. पल्लवी प्रविण मोरे हत्याकांड प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अनुभवी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक आघाडी कोकण प्रदेशाचे कार्याध्यक्ष अमित कांबळे यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले. या निवेदनात अलिबाग जिल्हा व सत्र न्यायालयातील अनुभवी वकील अॅड. प्रसाद पाटील तसेच महाड येथील अॅड. संजय भिसे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कु. पल्लवी मोरे ही अनुसूचित जाती प्रवर्गातील अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगी होती. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि न्यायालयीन लढा प्रभावीपणे लढता यावा यासाठी अनुभवी सरकारी वकिलांची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अड. प्रसाद पाटील यांनी अनेक गाजलेल्या फौजदारी खटल्यांमध्ये काम केले असून जिल्हा सरकारी वकील म्हणूनही त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच अॅड. संजय भिसे यांनाही फौजदारी प्रकरणांचा दीर्घ अनुभव असल्याने या दोघांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय पल्लवी मोरे ही कुटुंबातील कमावती सदस्य असल्याने तिच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या हत्याकांडामुळे रायगड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!