Homeपर्यावरणमाण-खटावमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; तीव्र उष्णतेत आक्रोश मोर्चा, आंदोलनानंतर रक्तदान

माण-खटावमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; तीव्र उष्णतेत आक्रोश मोर्चा, आंदोलनानंतर रक्तदान

म्हसवड दि. १३ : माण-खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न, पाणी वाटपातील अन्याय, पाणी चोरी आणि पाटबंधारे विभागाच्या कथित संगनमताविरोधात आज म्हसवड येथे शेतकऱ्यांनी तीव्र आक्रोश मोर्चा काढला. तब्बल ४० ते ४१ अंश तापमानातही शेकडो शेतकरी व महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्यात पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मोर्चाची सुरुवात म्हसवड येथील सिद्धनाथ रथगृहापासून झाली. सिद्धनाथ मंदिर, बाजारपेठ, सरकारी दवाखाना आणि एस.टी. स्टँड मार्गे मोर्चा अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडकला. महिला शेतकऱ्यांनी अप्पर तहसीलदार सौ. मीना बाबर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत “माण-खटावमध्ये पाणी घोटाळा झाला असून काही भागांना दोन-दोन आवर्तने दिली जातात, तर पूर्व भागाला एकही आवर्तन मिळत नाही,” असा आरोप केला. तसेच जिहे-कटापूर आणि तारळी योजनेतील पाणी वाटपात अन्याय व पाणी चोरी होत असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे, समन्यायी पाणी वाटप सुरू करणे, शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देणे आदी मागण्या केल्या. आंदोलनानंतर अनेक शेतकऱ्यांनी रक्तदान करून प्रशासनाचे लक्ष वेधले. “भले आमचे रक्त घ्या, पण आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या,” अशी भावनिक प्रतिक्रिया महेश करचे यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!