Homeमहाराष्ट्रशिरपूर महसूल प्रशासन थेट जनतेच्या दारी; बोराडीतील समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरपूर महसूल प्रशासन थेट जनतेच्या दारी; बोराडीतील समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सामान्य नागरिकांची शासकीय कामे जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने व्हावीत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’ला बोराडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिरपूर तहसील कार्यालय यांच्या वतीने आयोजित या शिबिरात ६०० हून अधिक नागरिकांची विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्यात आली.

राज्य शासनाच्या ‘महाराजस्व अभियान टप्पा १’ अंतर्गत आयोजित या शिबिरात महसूल विभागाशी संबंधित तब्बल १४ सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वितरण तसेच उत्पन्न, रहिवासी आणि शालेय दाखल्यांचे जागीच वाटप करण्यात आले.

याशिवाय संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, आयुष्मान भारत कार्ड, नवीन शिधापत्रिका, ट्रॅक्टर अनुदान तसेच वनपट्टाधारकांच्या केवायसीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी तहसीलदार महेंद्र माळी यांनी शासन नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून अशा शिबिरांमुळे सामान्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत, असे सांगितले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांनी महसूल विभागाच्या लोकाभिमुख उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाला बोराडी उपसरपंच राहुल रंधे, ग्रामस्थ, विद्यार्थी, तलाठी, कृषी सहाय्यक तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी पावरा यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

error: Content is protected !!