Homeउद्योगयुद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात एलपीजी-सीएनजी तुटवडा; केंद्राकडून ESMA कायदा लागू

युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात एलपीजी-सीएनजी तुटवडा; केंद्राकडून ESMA कायदा लागू

विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (घरगुती गॅस) आणि कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. आखाती देशांमधील वाढत्या युद्धपरिस्थितीमुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा परिणाम भारतातील गॅस वितरणावर होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम (ESMA) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिके-इस्रायल-इराण या देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती भागातील तेल व नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. भारत हा मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू आयात करणारा देश असल्याने या संघर्षाचा परिणाम देशातील इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे नागरिकांना सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास हॉटेल आणि खाद्यव्यवसायावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने ESMA कायदा लागू केला आहे. या कायद्याच्या माध्यमातून आवश्यक वस्तूंची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच तेल शुद्धीकरण कारखाने आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांना अधिक प्रमाणात एलपीजी उत्पादन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत राहू शकेल.

दरम्यान, ESMA (Essential Services Maintenance Act) हा कायदा भारतीय संसदेने 1968 मध्ये मंजूर केला होता. आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक सेवांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. सार्वजनिक सुरक्षा, जलपुरवठा, रुग्णालये, ऊर्जा, पेट्रोलियम, वाहतूक, बँकिंग आणि दळणवळण यांसारख्या सेवांचा या कायद्याच्या कक्षेत समावेश होतो.

तज्ज्ञांच्या मते, युद्धस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास इंधन आणि गॅस पुरवठ्यावर आणखी ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करत आहेत. नागरिकांनीही अनावश्यक साठेबाजी टाळून संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!