Homeमहाराष्ट्रपेट्रोल पंपावरील १.३३ कोटींचा अपहार; उपनिरीक्षक वाल्मिक वाघ अटकेत, मुलालाही ताब्यात

पेट्रोल पंपावरील १.३३ कोटींचा अपहार; उपनिरीक्षक वाल्मिक वाघ अटकेत, मुलालाही ताब्यात

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) : शहरातील पोलिस दलाच्या दक्षता पेट्रोल पंपावरील इंधन विक्रीतून आलेल्या रकमेचा सुमारे १ कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस दलाच्या दक्षता पेट्रोल पंपावरील दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी व्यवस्थापक म्हणून वाल्मिक वाघ यांच्याकडे होती. दरम्यान, इंधन विक्रीतून जमा झालेल्या रकमेतील मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याची बाब समोर आल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली.

प्राथमिक तपासात तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यानंतर वाघ फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली होती. अखेर १ मार्च रोजी वाघ यांनी स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन शरणागती पत्करली.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी राहुल गायकवाड यांनी पुढील चौकशी केली. तपासादरम्यान वाघ यांच्या मुलाच्या बँक खात्यातही अपहारातील रकमेचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!