Homeमहाराष्ट्रमहिलांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून समाजविकासात योगदान द्यावे – प्रा. अश्विनी जाधव...

महिलांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून समाजविकासात योगदान द्यावे – प्रा. अश्विनी जाधव मेहेत्रे

बबनराव नागरे (देऊळगाव राजा प्रतिनिधी ) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जायंट्स वेलफेअर फाउंडेशनद्वारे संचलित जायंट्स सहेली ग्रुप, देऊळगाव राजा यांच्या वतीने महिलांसाठी “महिलांची नवी झेप डिजिटल भारताकडे” तसेच “सोशल मीडियाचे फायदे व नुकसान” या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिव्हिल कॉलनी येथील श्री गणपती मंदिर परिसरात ६ मार्च रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात प्रा. अश्विनी जाधव मेहेत्रे यांनी महिलांना डिजिटल युगातील संधींबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या काळात तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. महिलांनी नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या विकासातही महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. राष्ट्रनिर्मितीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून विकसित भारत घडविण्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी महिलांना Artificial Intelligence (एआय) म्हणजे काय हे सोप्या शब्दांत व उदाहरणांसह समजावून सांगितले. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय आदी क्षेत्रांमध्ये एआयचा कसा उपयोग होऊ शकतो याबाबत सविस्तर माहिती दिली. डिजिटल युगात महिलांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेत डिजिटल कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.

तसेच डॉ. प्रियंका देशमुख यांनी सोशल मीडियाचे फायदे व नुकसान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तींशी त्वरित संवाद साधणे शक्य झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण, माहिती, व्यवसायिक संधी तसेच विविध कला-कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून गायन, नृत्य, पाककला, चित्रकला यांसारख्या कलांना प्रसिद्धी मिळू शकते तसेच रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत.

मात्र सोशल मीडियाचा अतिरेक मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर होणारी तुलना, ट्रोलिंग आणि ‘लाईक्स’च्या मागे लागण्याची प्रवृत्ती यामुळे नैराश्य, चिंता आणि न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याचा वापर मर्यादित व जबाबदारीने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी विषयाबद्दल उत्सुकता व्यक्त करत एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाविषयी अधिक जाणून घेण्याची तयारी दर्शवली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रुपच्या अध्यक्षा किरण अंबुस्कर तसेच लता हरकुट, राखी काबरा, जया जैन, सविता पाटील, मालती कायंदे, शशी भाला, ज्योती आगेवाल, तरुणा भारूका आणि सुनीता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!