Homeताज्या बातम्याNagarparishad–Nagarpanchayat Election Result 2025: नागपूरसह राज्यभरातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय; भाजप...

Nagarparishad–Nagarpanchayat Election Result 2025: नागपूरसह राज्यभरातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय; भाजप सर्वोत्तम कामगिरी करत पहिला क्रमांक

Times of Maharashtra Desk : राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले असून, भाजपने महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. नागपूर जिल्ह्यातील निकालांनुसार भाजपने जोरदार कामगिरी करत नगराध्यक्ष व नगरसेवकांमध्ये बहुमत मिळवले असून, जिल्ह्याने मानाचा ताट ठेवला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “महायुतीने ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. विरोधकांचे बालेकिल्ले पूर्णपणे उध्वस्त झाले असून सावनेरमध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही.”

नागपूर जिल्ह्यातील विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामगिरी येथील शासकीय निवासस्थानी छोटेखानी सत्कार देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “विजयाची ही मालिका महापालिकेतही कायम ठेवू, महापालिका जिंकू आणि नंतर जिल्हा परिषदही जिंकू. मात्र विजयाने आपण माजणार नाही, हे लक्षात ठेवावे.”
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नेत्यांनी निवडणुकांमध्ये आक्रमक प्रचार केला. राज्यभरात भाजपचे १२० नगराध्यक्ष निवडून आले असून ही आता पर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांत भाजपने चांगली कामगिरी केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विजयी कार्यकर्त्यांचेही कौतुक केले आणि सांगितले की, नागपूर जिल्ह्यातील २७ भागांमध्ये जोरदार विकासाची जबाबदारी विजयी नगरसेवकांवर आहे. विजयी नगरांना ‘मॉडेल शहर’ म्हणून विकसित करण्याची योजना आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!