Homeताज्या बातम्यामाणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; शिक्षेला स्थगिती, आमदारकी कायम

माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; शिक्षेला स्थगिती, आमदारकी कायम

Times of Maharashtra Desk: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी सुनावण्यात आलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांची आमदारकी कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस जारी केली असून, अंतिम निर्णय येईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या ‘व्ह्यू अपार्टमेंट’ या इमारतीत माणिकराव कोकाटे यांनी सुमारे 30 वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवून अल्प उत्पन्न गटासाठीची सदनिका मिळवल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या या सदनिकांमध्ये कोकाटेंसह त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांचा समावेश होता.या प्रकरणी फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपील केलं, मात्र सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा कायम ठेवली होती.

सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली असता, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देत कोकाटे यांना मोठा दिलासा दिला.याचिकाकर्त्यांकडून दोषसिद्धीमुळे कोकाटेंची आमदारकी रद्द होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे हा दावा तूर्तास फेटाळण्यात आला आहे.

मंत्रिपद गेल्यानंतर आणि विविध राजकीय अडचणींमध्ये सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे कोकाटेंचं राजकीय भवितव्य तात्पुरतं तरी सुरक्षित झालं असून, नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!