Homeताज्या बातम्याNagarparishad–Nagarpanchayat Election Result 2025: ‘आता ती वेळ आली आहे!’ — नगरपरिषद निकालानंतर...

Nagarparishad–Nagarpanchayat Election Result 2025: ‘आता ती वेळ आली आहे!’ — नगरपरिषद निकालानंतर नितेश राणेंचं सूचक ट्वीट, कोकणात राजकीय हालचाली वाढल्या

Times of Maharashtra Desk : राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असूनया निवडणुकांमध्ये महायुतीने स्पष्ट आघाडी घेतली आहे. विशेषतः कोकणातील निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मालवण नगरपरिषदेत शिंदे गटाच्या शिवसेनेने जोरदार कामगिरी करत 10 जागांवर विजय मिळवला आहे, तर भाजपाला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले.

सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाने 11 जागा जिंकत आघाडी घेतली असून, शिंदे गटाच्या शिवसेनेला 7, काँग्रेसला 1 आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. कणकवली नगरपरिषदेत भाजपाला 9 तर शहर विकास आघाडीला 8 जागा मिळाल्या. मात्र, भाजपाचे अधिक उमेदवार विजयी होऊनही नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे 145 मतांनी विजयी झाले. त्यामुळे कणकवलीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार व मंत्री तसेच भाजपाचे नेते नितेश राणे यांना राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.

दरम्यान, या निकालांच्या पार्श्वभूमीवर मंत्री व भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टने राजकीय वातावरण तापले आहे.

“गप्प होतो… पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी… पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर त्या खऱ्या वाटायला लागतात… आता ती वेळ आली आहे,”

असे ट्वीट त्यांनी केले आहे. या ट्वीटमुळे मालवण आणि सावंतवाडीतील निकालांशी संबंधित अंतर्गत राजकीय घडामोडींबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एकूण राज्याचा विचार करता, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाचाच वरचष्मा दिसून आला आहे. 288 पैकी 117 ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले असून, 34 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगराध्यक्षपद पटकावले आहे. केवळ नंदुरबार आणि हिंगोली जिल्ह्यांत भाजपाला यश मिळाले नाही.

भाजपानंतर शिंदे गटाची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या 53 नगराध्यक्षांची निवड झाली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 37 उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. याउलट, महाविकास आघाडीला या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसला असून काँग्रेस, ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांना मिळून केवळ 44 नगराध्यक्षपदे मिळाली आहेत. त्यामध्ये काँग्रेसला 28, ठाकरे गटाला 9 आणि राष्ट्रवादीला 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

या निकालांमुळे राज्याच्या राजकारणात महायुतीची ताकद अधिकच ठळक झाली असून, कोकणातील अंतर्गत राजकीय संघर्ष आणि नेत्यांमधील मतभेद पुढील काळात अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!