Homeताज्या बातम्याMumbai Municipa, Election : “शेवटच्या क्षणी युती, शेवटच्या क्षणी उमेदवार: ठाकरे बंधूंची...

Mumbai Municipa, Election : “शेवटच्या क्षणी युती, शेवटच्या क्षणी उमेदवार: ठाकरे बंधूंची काटेकोर रणनीती”

Times of Maharashtra Desk : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यंदाची महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची, असा निर्धार भाजपने केला असून त्यासाठी आक्रमक रणनिती अवलंबली जात आहे.भाजपकडून मनसे आणि ठाकरे गटातील नाराज नेत्यांना आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हा धोका ओळखून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संभाव्य फोडाफोड रोखण्यासाठी एक खास आणि काटेकोर रणनीती आखली आहे.

युतीची घोषणा अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी
मुंबई महापालिकेसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्यास, प्रत्येक प्रभागात एकाच उमेदवाराला संधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांकडून बंडखोरी किंवा भाजपमध्ये प्रवेशाचा धोका वाढू शकतो. हा धोका टाळण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी आदल्या दिवशी युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत. 22 किंवा 23 डिसेंबर रोजी मुंबईत भव्य मेळाव्याचे आयोजन करून ठाकरे बंधू संयुक्तपणे युतीची घोषणा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाराज नेत्यांना दुसऱ्या पक्षाशी वाटाघाटी करण्यासाठी फारसा वेळ मिळणार नाही आणि संभाव्य बंडखोरीवर नियंत्रण राहील, असा अंदाज आहे.

उमेदवारांची नावे शेवटच्या क्षणी जाहीर होणार
युतीनंतर जागावाटप निश्चित झाल्यावर उमेदवारांची नावे लगेच जाहीर केली जाणार नाहीत. अंतिम उमेदवारांना पक्षाकडून थेट फोन करून कळवण्यात येईल आणि त्यानंतर अधिकृत एबी फॉर्म दिला जाईल. उमेदवारांची नावे शेवटच्या क्षणी जाहीर केल्यास बंडखोरांना उमेदवारी अर्ज भरणे किंवा दुसऱ्या पक्षात जाणे कठीण होईल, ही या रणनीतीमागची भूमिका आहे.

जागावाटप जवळपास निश्चित
मनसे-ठाकरे गटाच्या युती आणि जागावाटपाबाबत ‘शिवतीर्था’वर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशीही संवाद साधला आहे. राज ठाकरे आज मनसेच्या प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार असून, गुरुवारी ठाकरे बंधू युतीची औपचारिक घोषणा करतील, अशी माहिती मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

दोन्ही पक्षांतील जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात असून, उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितपणे याबाबतची घोषणा करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या वाढत्या ताकदीसमोर ठाकरे बंधूंची ही संयुक्त खेळी कितपत यशस्वी ठरते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!