Homeक्राईमMundhwa Land Scam "मुंढवा जमीन घोटाळा: अजित पवार गटावर थेट आरोप, दमानिया...

Mundhwa Land Scam “मुंढवा जमीन घोटाळा: अजित पवार गटावर थेट आरोप, दमानिया पुन्हा आक्रमक”

Times of Maharashtra Desk: पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण अधिकच गहरावत चालले असून आता या प्रकरणात अजित पवार आणि त्यांच्या गटातील महत्त्वाच्या नेत्यांवर थेट आरोप होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप करत या संपूर्ण व्यवहारामागे मोठे राजकीय संरक्षण असल्याचा दावा केला आहे.या प्रकरणाची मूळ कहाणी 2006 पासून सुरू होते, ज्या वेळी शीतल तेजवानी यांनी तब्बल 89 लोकांकडून जमीन व्यवहारासाठी पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney – PoA) घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर परिस्थिती 2018 मध्ये बदलली आणि पुण्यातील माजी उपमहापौर तसेच मगरपट्टा सिटीचे डायरेक्टर निलेश मगर यांनी या जमिनीबाबत 18 लोकांकडून PoA घेतल्याचा दावा करण्यात आला. दमानिया यांच्या मते, ही जमीन आधीच वतनाची आणि सरकारी नोंदवहीत संरक्षित दर्जाची असल्याने 18 लोकांचे ‘कुळ’ दाखवणे नियमबाह्य आणि संभाव्य फसवणुकीचा भाग आहे.

दमानिया यांनी पुढे असा आरोप केला की, “या जमिनीवर अजित पवार यांचा 2018 पासून डोळा होता. सत्ता मिळताच जमिनीचा व्यवहार त्यांच्या मुलाच्या नावाने करण्याची तयारी सुरू झाली होती.” त्यांनी या व्यवहारावर तातडीने खारगे समितीने तपास करावा आणि निलेश मगर तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, या आरोपांवर निलेश मगर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले, “माझा या संपूर्ण जमीन व्यवहाराशी काहीही संबंध नाही. 2018 मध्ये जे लोक माझ्याकडे मदतीसाठी आले, त्यांच्याशी कोणताही व्यवहार पूर्ण झाला नाही. उलट मला अजित पवारांचा कार्यकर्ता असल्यामुळे राजकीय सूड म्हणून लक्ष केले जात आहे.” तसेच त्यांनी गरज पडल्यास दमानिया यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.

या घोटाळ्याने पुण्यातील राजकारणात खळबळ माजवली असून आगामी काळात तपासाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. खारगे समिती पुढे काय भूमिका घेते आणि या प्रकरणात अजून कोणती नवी नावे समोर येतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.हा प्रकरण निव्वळ जमिनीचा वाद नसून राजकारण, दबावगट आणि प्रशासन यांच्यातील गुंतागुंत असलेले एक मोठे वादळ असल्याचे संकेत मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!