Homeताज्या बातम्याED Raid Baramatiबारामतीत ईडीची धडक कारवाई; लोखंडे दाम्पत्यावर दुग्ध व्यवसायात १० कोटींच्या...

ED Raid Baramatiबारामतीत ईडीची धडक कारवाई; लोखंडे दाम्पत्यावर दुग्ध व्यवसायात १० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

Times of Maharashtra Desk: आज सकाळपासून म्हणजेच १० डिसेम्बर रोजी बारामतीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई सुरू केली असून आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या राहत्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. ही कारवाई जळोची गावासह बारामती परिसरात सुरू आहे. पुणे आणि मुंबईतील दूध डेअरी व्यवसायिकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याच्या तक्रारीनंतर ही छापेमारी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडे दाम्पत्याने दुग्ध व्यवसायात मोठे व्यवहार करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून १० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनाही गुंतवणूक प्रस्ताव दाखवून पैसे उकळल्याचे समोर आले आहे.बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या १०,२१,५९,३६७ रुपयांच्या तक्रारीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे. चौकशीदरम्यान आनंद आणि विद्या लोखंडे यांनी तरुण उद्योजक असल्याचे भासवून स्वतःला एका प्रभावशाली राजकीय नेत्याचे समर्थक असल्याचा दावा करून विश्वासार्हता निर्माण केली असल्याचे उघड झाले.

स्रोतांनुसार, लोखंडे दाम्पत्याने मुंबईतील एका कंपनीकडून २ कोटी रुपयांचे लोणी खरेदी केले आणि आठवड्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले, मात्र पेमेंट कधीही करण्यात आले नाही. तसेच दूध पुरवठा करण्याच्या नावाखाली ९३ लाख रुपये घेण्यात आले, पण पुरवठा झाला नाही. दूध व्यवसायिकांना नफा देण्याच्या बहाण्याने ६.४३ कोटी रुपयांची बिलं उभी करण्यात आली, मात्र निधीचा गैरवापर करण्यात आला. अनेक व्यवहारांमध्ये दिलेले धनादेश बाउन्स झाल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणात अनेक गुंतवणूकदारांनी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे (EOW) तक्रारी दाखल केल्या असून ईडीकडून आर्थिक प्रवाह, खाते व्यवहार आणि संबंधितांच्या मालमत्तांची तपासणी सुरू आहे.या धाडीमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत आणखी खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!