Homeताज्या बातम्याभावाच्या आणि मुलीच्या मदतीने पतीची हत्या; दसऱ्याच्या दिवशी केले पतीला ठार...

भावाच्या आणि मुलीच्या मदतीने पतीची हत्या; दसऱ्याच्या दिवशी केले पतीला ठार…

चंद्रपूर :- दारू पिऊन सतत वाद घालून पत्नी व मुलीला मारहाण करणाऱ्या पतीस मुलीच्या आणी भावाच्या मदतीने हत्या केल्याची थरारक घटना दसऱ्याच्या दिवशी मंगळवारी शहरातील नगिनाबाग येथे घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी पत्नी मंगला चौधरी, मुलगी जयश्री चौधरी, भाऊ विलास शेंडे याला अटक केली आहे.
त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नीलकंठ चौधरी (५२) असे मृत पतीचे नाव आहे. चंद्रपूर शहरातील नगिनाबागमध्ये राहणारा निलकंठ चौधरी हा मोलमजुरीचे काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होता. त्याला याकामी पत्नी मदत करीत होती. परंतु निलकंठ हा व्यसनाच्या आहारी गेला होता. तो नियमित दारू प्राशन करायचा आणि घरात येऊन पत्नी व मुलींसोबत विविध कारणांवरून भांडण करायचा. पत्नीकडे मंडळी आली की त्यांना शिविगाळ करून हाकलून लावायचा. दसऱ्याच्या दिवशी बहिणीला भेटण्याकरीता मुल तालुक्यातून सुशी दाबगाव येथून भाऊ विलास शेंडे हा आला होता. दरम्यान तो घरी दिसताच निलंकठने साळ्याला अश्लिल भाषेत शिविगाळ सुरू केली. त्यामुळे भांडण सुरू झाले. भांडण वाढत गेल्याने त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.
नेहमीच घरात भांडण करणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळून संतापलेली पत्नी मंगला व मुलगी व साळ्याने लोखंडी रॉड, काठीने डोक्यावर जबर मारहाण केली. एवढेच नाही तर वरवंटा त्याच्या छातीवर ठेवला. दरम्यान साळा विलास शेंडे यानेच रामनगर पोलिस स्टेशन गाठून माहिती दिली. दरम्यान रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले, नापोशी राहुल सहारे, पोलिस शिपाई देविदास राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून पत्नी, मुलगी, साळा तिघांनाही अटक केली. बुधवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!