Homeताज्या बातम्याNashik BJP Municipal Elections ; ‘सगळेच नेते व्हायचे, मग कार्यकर्ते कोण?’ –...

Nashik BJP Municipal Elections ; ‘सगळेच नेते व्हायचे, मग कार्यकर्ते कोण?’ – देवयानी फरांदे यांचा भावूक सवाल

Times of Maharashtra Desk: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपमध्ये आज माजी आमदार, माजी महापौरांसह पाच प्रमुख नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला. मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मात्र या पक्षप्रवेशावरून भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली.

भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला अनुपस्थित राहून अप्रत्यक्ष विरोध दर्शवला होता. पक्षप्रवेशाच्या वेळी भाजप कार्यालयाबाहेर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना कार्यालयाबाहेरच घेराव घातल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “आज दिनकर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मनसे, काँग्रेस आणि उबाठा गटातील अनेक नेते मुख्य प्रवाहात आले आहेत. भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच त्यांनी प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील.”

वाटले ते बोलले. गेल्या 40 वर्षांत मी कधीही स्वतःसाठी भूमिका घेतली नाही. – आमदार देवयानी फरांदे

दरम्यान, आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिक्रिया देताना आपण नाराज नसल्याचे सांगितले, मात्र त्यांच्या डोळ्यांत अश्रू स्पष्टपणे दिसत होते. “मी कोणाचा विरोध केला नाही, फक्त माझे मत मांडले होते. आमदार म्हणून जे वाटले ते बोलले. गेल्या 40 वर्षांत मी कधीही स्वतःसाठी भूमिका घेतली नाही. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे. सगळेच नेते बनू पाहतात, मग कार्यकर्ते कोण राहणार?” असे भावूक शब्द त्यांनी यावेळी उच्चारले.

हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण आहे – संजय राऊत यांची टीका 
दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही इतर पक्षांतील आमदार, खासदार आणि नेत्यांना कोणालाही न जुमानता पक्षात घेतले जात आहे. हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण आहे,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तर आता गिरीश महाजन आपली गँग तयार करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

नाशिकमधील या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात वाढलेली अस्वस्थता आता उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!