Homeताज्या बातम्यालोककलावंत रघुवीर खेडकर, वारली संगीतकार मा.भिकल्या धिंडा यांचा पद्म पुरस्कारांने सन्मान

लोककलावंत रघुवीर खेडकर, वारली संगीतकार मा.भिकल्या धिंडा यांचा पद्म पुरस्कारांने सन्मान

Times Of Maharashtra Desk : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने सन 2026 साठीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समावेश आहे. कला, साहित्य, समाजसेवा, शेती, वैद्यकीय सेवा आदी क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना यंदा हा बहुमान देण्यात आला आहे.

लोकनाट्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणारे ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण व लोककलेच्या जतनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.

तसेच, वारली आदिवासी लोकसंगीत जपणारे आणि लोकप्रिय करणारे संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आदिवासी संस्कृती आणि परंपरागत संगीत राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते.

वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्रातील डॉ. अर्मिडा फर्नांडीस यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आरोग्यसेवेत त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी ठरले आहे.

याशिवाय, परभणी जिल्ह्यातील प्रगत शेतकरी श्रीरंग लाड यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कापूस पिकाच्या उत्पादनवाढीसाठी त्यांनी केलेल्या संशोधनात्मक प्रयोगांची दखल घेत केंद्र सरकारने त्यांचा सन्मान केला आहे.

दरम्यान, पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानले जातात. पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री असे तीन प्रकार या पुरस्कारांचे आहेत. कला, समाजकार्य, विज्ञान, प्रशासन, आरोग्यसेवा, शिक्षण, साहित्य, क्रीडा, उद्योग आणि शेती अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान प्रदान केला जातो.महाराष्ट्रातील या मान्यवरांच्या यशामुळे राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरेचा गौरव वाढला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!