विष्णू गायकवाड (गेवराई प्रतिनिधी ) : गेवराई येथील ज्येष्ठ नागरिक पार्वती शंकर भुते यांचे वयाच्या 110 व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले. त्या राष्ट्रीय कबड्डीपटू गणेश भुते यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने भुते कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पार्वती भुते या शांत, प्रेमळ आणि कष्टाळू स्वभावामुळे समाजात आदराचे स्थान मिळवले होते. दीर्घायुष्य लाभलेल्या पार्वती भुते यांनी आपल्या आयुष्यात कुटुंबाचे संस्कार जपले आणि समाजातही आपुलकीचे संबंध निर्माण केले होते.
त्यांचा अंत्यविधी रविवार (दि. 08 मार्च 2026) रोजी सकाळी 9.30 वाजता चिंतेश्वर स्मशानभूमी, गेवराई येथे करण्यात आला. या वेळी शहरातील व तालुक्यातील समाज बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.






















