Times of Maharashtra Desk, Phaltan Accident Alert : साताऱ्यामधील फलटण-राजळे रस्त्यावर काम चालू आहे. यामुळे रास्ता बरसचा विस्कटलेला आहे. याच रस्त्यावरून कंपनीच्या मालवाहतूक गाड्यांची सतत ये- जा असते. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून वेगाने मोठ्या गाड्या चालवल्या जातात. या मार्गावर वाहतुकीचा दबाव आणि वाहनचालकांची गैरजबाबदारी वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः, काही वाहनचालक दारूच्या नशेत असून रस्त्यावर जोमाने गाड्या चालवत असल्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. राजाळे रोडवरील ही समस्या केवळ स्थानिकांचा जीव धोक्यात टाकणारी नाही तर संपूर्ण फलटण परिसरातील वाहतुकीच्या सुरक्षेला मोठा प्रश्न आहे. या गाड्यांचे नंबर नसणे आणि दारूच्या नशेत चालकांचे असामाजिक वर्तन यामुळे अनेकांनी त्रास सहन केला आहे.
फलटण मध्ये बारामती सारखी परिस्थिति
गेल्या काही महिन्यांत बारामती मध्ये असंख्य धोकादायक प्रसंग घडले असून काही अपघातांमध्ये गंभीर जखमीसह मृत्यूहोण्याचीही नोंद आहे. बारामतीत घडलेल्या भयानक अपघातांसारखेच फलटणमध्येही रस्त्यांवर कणखर नियमांचा अभाव असल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो असा धोका निर्माण होत चालला आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे येथील स्थानिकाचे मत असून “या रस्त्यावर गाडीची नोंदणी नसेल तरी सुसाट वेगाने वाहनचालक जात आहेत. दारूच्या नशेत वाहन चलवल्याने येथील लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने तत्परतेने कारवाई करावी.” असे येथील लोकचे मत आहे.
फलटण-राजळे मार्ग हा व्यापारी व सर्वसामान्य प्रवाशांसाठी महत्त्वाचा असल्याने या रस्त्यावरील सुरक्षिततेची खबरदारी गरजेची आहे. वाहनांचा तंत्रशुद्ध तपास, संपूर्ण वाहनांची नोंदणी, तसेच अति वेग आणि मादक पदार्थांच्या नियंत्रणासाठी कडक पोलिसी उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. याशिवाय या मार्गावरील रस्त्याचे दर्जा आणि दुरुस्तीही वेळेत करणे गरजेचे आहे, कारण अनेक ठिकाणी रस्ता काम खराबामुळे अपघात होण्याची शक्यता वाढत आहे. त्यामुळे सुसाट जाणाऱ्या या हयावा ट्रक गाड्या यांचे वेग नियंत्रणात येईल का असा प्रश्न नागरिकांकडून प्रशासनाला विचारलं जात आहे



















