Homeताज्या बातम्याPune Leopard Attack : अखेर नरभक्षक बिबट्या ठार; 20 दिवसांत घेतले होते...

Pune Leopard Attack : अखेर नरभक्षक बिबट्या ठार; 20 दिवसांत घेतले होते तीन बळी…

Times of Maharashtra Desk, Pune : मागील  चार ते पाच दिवसांच्या प्रचंड जनक्षोभानंतर अखेर आज वनविभागाच्या पथकाला जुन्नर, आंबेगाव, शिरूर परिसरात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश आले आहे. काल रात्री उशिरा पिंपरखेड गावामध्ये गस्त घालत असताना ड्रोन कॅमेऱ्यामध्ये हा बिबट्या दिसला होता. त्यानंतर वनविभागाचे पथक ह्या बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यासाठी गेले असता, डार्टचा नेम चुकल्याने ह्या बिबट्याने वनविभागाच्या पथकावर प्रतिहल्ला केला. अखेर बचावात्मक उपाययोजना म्हणून पथकातील शार्प शूटर्सने दोन राऊंड फायर करून बिबट्याला ठार केले.

20 दिवसांत घेतले होते तीन बळी

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड व परिसरामध्ये मागील वीस दिवसांमध्ये नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन बळी गेले. शिवन्या शैलेश बोंबे या सहा वर्षीय चिमुकलीचा, भागुबाई रंगनाथ जाधव या ब्याऐंशी वर्षीय वृद्धेचा, आणि २ नोव्हेंबर रोजी रोहन विलास बोंबे या तेरा वर्षीय मुलाचा या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने मोठ्या प्रमाणात संताप उसळून जुन्नर,शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यामधील नागरिकांनी आंदोलन केले होते.

बेशुद्ध करण्याचा प्रयत्न अयशस्वी

मागील दोन दिवसांत या परिसरात ठीक ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळी व परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे 400 मीटर अंतरावर बिबट्या दिसून आला होता. पथकाने त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला परंतु, तो अपयशी ठरल्याने बिबट्या चवताळून प्रतिहल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री 10.30 वाजताच्या सुमारास गोळी झाडल्याने हा सहा वर्षीय नर बिबट्या मृत झाला. त्यानंतर सदर नरभक्षक बिबट्याचे शव पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आल्यानंतर सदर शव, शवविच्छेदना करिता माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.

आंदोलनानंतर प्रशासनाला जाग 

वीस दिवसांमध्ये तीन मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी 2 नोव्हेंबर रोजी वनविभागाच्या वाहनाला व पिंपरखेड येथील बेस कॅम्प इमारतीला आग लावली होती. तसेच दिनांक 3 नोव्हेंबर रोजी पुणे- नाशिक व बल्हे – जेजूरी महामार्ग सुमारे अठरा तास रोखून धरला होता. नागरिकांच्या आंदोलनानंतर वनसंरक्षक आशीष ठाकरे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य यांची या बिबट्याला ठार करण्यासाठी परवानगी घेतली होती. यानंतर हा नरभक्षक बिबट्या जेरबंद अथवा ठार करण्यासाठी रेस्क्यू संस्था पुणेचे पशुचिकित्सक डॉ. सात्विक पाठक व शार्प शूटर जुबिन पोस्टवला, डॉ. प्रसाद दाभोळकर यांना पाचारण करण्यात आले होते.

RELATED ARTICLES

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!