Homeमहाराष्ट्रपिंपळगाव येथे उद्या ‘महाराजस्व समाधान शिबीर’

पिंपळगाव येथे उद्या ‘महाराजस्व समाधान शिबीर’

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ अंतर्गत शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी मौजा पिंपळगाव येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा एकाच ठिकाणी करण्यात येणार आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयांत वारंवार चकरा माराव्या लागू नयेत आणि सेवा थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.

पिंपळगाव महसूल मंडळ स्तरावर होणाऱ्या या शिबिरात ७/१२ व ८-अ उतारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) तसेच नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र यांसारख्या विविध दाखल्यांचे वाटप व त्रुटींचे निराकरण केले जाणार आहे.

याशिवाय संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच रेशन कार्डाशी संबंधित अर्जांची दखलही घेतली जाणार आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह (आधार कार्ड, रेशन कार्ड, जुने उतारे इ.) सकाळी १० वाजल्यापासून उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिराला आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया, अप्पर जिल्हाधिकारी संतोष थिटे, प्रांत अधिकारी पर्वणी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर शिबिरामध्ये सुमारे १५ विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात येणार असून, नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. सर्व नागरिकांनी या समाधान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सतीश मासाळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!