Homeताज्या बातम्यापिंपरी चिंचवड (काळेवाडी प्रभाग २२) मध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता; ‘आयात’ उमेदवार नको,...

पिंपरी चिंचवड (काळेवाडी प्रभाग २२) मध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता; ‘आयात’ उमेदवार नको, निष्ठावंतांची ठाम भूमिका

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग

Times of Maharashtra Desk:  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या स्थानिक संघटनेत हालचाली वाढल्या आहेत. अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी बाहेरून उमेदवार देण्याच्या सुरू असलेल्या चर्चांमुळे पक्षातील जुने, निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. या चर्चांना वेळीच पूर्णविराम द्यावा आणि स्थानिक कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अनेक वर्षांपासून काम करणारे कार्यकर्ते सांगतात की, निवडणूक काळात केवळ प्रचार, नियोजन आणि मैदानात काम करण्यापुरतेच आम्हाला मर्यादित ठेवले जाते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. स्थानिक पातळीवर जनतेशी थेट संपर्क असलेले, विश्वासार्ह आणि सक्रिय कार्यकर्ते असताना बाहेरील उमेदवारांच्या चर्चांमुळे निराशा पसरत आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मते, उमेदवारी ठरवताना केवळ निवडणुकीतील गणित नव्हे, तर संघटनेची निष्ठा, सातत्यपूर्ण काम आणि स्थानिक स्वीकारार्हता या बाबीही महत्त्वाच्या आहेत. बाहेरून उमेदवार दिल्यास कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम प्रचार यंत्रणेवर होऊ शकतो, असा इशाराही दिला जात आहे.

दरम्यान, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक संघटनेशी सखोल चर्चा करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सध्या केवळ चर्चा सुरू असली तरी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास संभाव्य नाराजी टाळता येईल आणि निवडणुकीत पक्ष अधिक ताकदीने उतरू शकेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!