Homeताज्या बातम्याअवैध शेड बांधकाम प्रकरणी पुणे मनपा प्रशासनाचा निर्लज्जपणाचा कळस ; फक्त नोटीस...

अवैध शेड बांधकाम प्रकरणी पुणे मनपा प्रशासनाचा निर्लज्जपणाचा कळस ; फक्त नोटीस मात्र ठोस कारवाई नाही ; अतिक्रमण न तोडण्यासाठी `आका`चा दबाव…

अवैध शेड बांधकाम प्रकरणी पुणे मनपा प्रशासनाचा निर्लज्जपणाचा कळस ; फक्त नोटीस मात्र ठोस कारवाई नाही?

पुणे :- अवैध शेड बांधकामाची तक्रार देऊनसुद्धा त्यावर उचित आणि कठोर कारवाई न करून पुणे मनपाचा बांधकाम विभाग एकप्रकारे निर्लज्जपणाचा कळस गाठत असल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. या माध्यमातून मनपा प्रशासनाच्या निगरगट्टपणाची लक्तरं वेशीवर टांगली जात आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण काढण्याची अती तत्परता दाखवणारे मनपा प्रशासन या अवैध शेड बांधकाम तोडण्याच्या  प्रकरणी एव्हढे लाचार का दिसत आहे, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांनी मनपाच्या नोटिशीला अक्षरशः केराची टोपली दाखवल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, या प्रकरणी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर एक लोकप्रतिनिधी दबाव आणून अतिक्रमण हटवण्याला विरोध करीत असल्याची खात्रिलायक माहिती मिळाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील वडगाव शेरी, नगर रोड येथील टाटा गार्ड रुम ९ बीआरटी रस्त्यावर एअर फोर्सट स्टेशन समोर मे. बोरा-गलांडे असोसिएट्सच्या वतीने शेडचे अवैधरित्या बांधकाम करण्यात येत आहे. अवैधरित्या यासाठी म्हणावे लागते कारण की या शेडचे बांधकाम करण्यासाठी मनपा कडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे हे बांधकाम एअर फोर्स स्टेशनपासून केवळ १०० मीटर परिघात होत असल्या कारणाने यासंदर्भात परवानगी घेणे हे बंधनकारकच आहे. असे असतानाही मे. बोरा-गलांडे असोसिएट्स यांच्याकडून अवैधरित्या पत्र्याच्या शेडचे हे बांधकाम अगदी बिनदिक्कतपणे करण्यात येत आहे.
या अवैध बांधकामासंदर्भात अॅड. भाऊसाहेब ढोकणे यांनी मनपाच्या बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती, परंतु ही तक्रार दाखल करून बरेच दिवस होऊनदेखील मनपा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. या प्रकरणी बातमी प्रकाशित होताच मनपा प्रशासनाला खडबडून जाग आली व त्यांनी अगदी तोंडदेखली जुजबी कारवाई केली. दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी मनपाच्या बांधकाम विभागाने यासंदर्भात गलांडे-बोरा असोसिएट्सला एक नोटीस पाठवून २४ तासांच्या आत अवैधरित्या बांधलेले शेड तोडण्याचे निर्देश दिले. शेड काढून न घेतल्यास त्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने हे शेड तोडण्यात येईल व फौजदारी कारवाई करण्यात आला असा गर्भीत इशाराही गलांडे-बोरा असोसिएट्सला देण्यात आला.
दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात आलेल्या या नोटिशीनुसार हे अवैध शेड १ किंवा २ मार्च २०२५ पर्यंत काढून घेणे बंधनकारक होते. परंतु गलांडे-बोरा असोसिएट्स ने हे शेडचे बांधकाम दि. १६ मार्चपर्यंतदेखील काढलेले नाही.

तसेच पुन्हा अवैध पत्रा शेडचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नोटिशीची मुदत संपून १५ दिवस लोटले तरीही मनपा प्रशासन पूर्णपणे ढिम्म असून, मनपा प्रशासनाकडून या अवैध बांधकामावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यासंदर्भात मनपाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता अजित सुर्वे आणि कनिष्ठ अभियंता भूषण कोकाटे यांना विचारणा केली असता, ते अवैध बांधकाम लवकरच तोडले जाईल, अशी वेळकाढू शासकीय उत्तरे देण्यात येत आहेत. परंतु ठोस कारवाई मात्र होताना दिसून येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

error: Content is protected !!