Homeताज्या बातम्याभाडेवाढ मुळे पुणेकर आक्रमक ; "भाडेवाढीच्या बसमध्ये पायच ठेवायला भीती वाटते!" —...

भाडेवाढ मुळे पुणेकर आक्रमक ; “भाडेवाढीच्या बसमध्ये पायच ठेवायला भीती वाटते!” — पायल राऊत यांची मार्मिक टीका…

भाडेवाढ मुळे पुणेकर आक्रमक; “भाडेवाढीच्या बसमध्ये पायच ठेवायला भीती वाटते!” – पायल राऊत यांची मार्मिक टीका…
महिला आयुक्तांनी महिलांच्या समस्या समजण्याची गरज…
Speacial Report By Times Of Maharashtra

पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) – पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) १ जूनपासून अचानक केलेली भाडेवाढ ही प्रवाशांच्या खिशावर दरोडा आहे की, विकासाच्या नावाखाली चाललेली क्रूर चेष्टा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप प्रवाशांच्या डोळ्यांतील पाण्यातच दडलं आहे. गेल्या काही वर्षात एकदाही दर न वाढवलेली PMPML अचानक दर दुप्पट करून काय साध्य करू पाहतेय?

किमान ५ किलोमीटरच्या प्रवासासाठी आधी ५ रुपयांत पूर्ण होणारी यात्रा, आता १० रुपयांमध्येही अर्धवट वाटतेय. पुणे-पिंपरी दरम्यानचा दररोजचा पास ४० रुपयांवरून ७० रुपयांवर गेला आणि PMRDA हद्दीत मासिक पास १५०० रुपये करून प्रवाशांच्या धैर्याची परीक्षा घेतली जातेय. हे सगळं एका रात्रीत झालंय – न विचारपूस, न चर्चा काहीच नाही! हे नेमकं कोणासाठी झालंय हा मोठा प्रश्न सध्या उद्भवला आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the below Image👇👇
👆👆Click the above Image 👆👆
Advertisement by Unique Computers 

“आमच्या मुली आधीच कमी पगारात काम करत आहेत. महिन्याच्या शेवटी आम्ही कशीबशी घर चालवत होतो. आता हे भाडेवाढीचं संकट म्हणजे आमच्या खिशावर आघातच नाही, तर रोजच्या जगण्यावर घाव आहे,” असं मार्मिक शब्दांत प्रवासी पायल राऊत म्हणाल्या. त्यांच्या भावना एकट्याच्याच नाहीत – तर लाखो सामान्य प्रवाशांच्या आहेत.

दरवाढीच्या पहिल्याच दिवशी PMPML ने ५५ लाख रुपयांचे ‘अतिरिक्त’ उत्पन्न मिळवलं हे खरं, पण हे उत्पन्न नक्की कोणाच्या कष्टातून आणि वेदनांतून मिळालं हे पाहणं महत्त्वाचं आहे. रविवारी एकूण १.९७ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला – पण त्यामागे ९.४५ लाख प्रवाशांचा संताप दडलेला आहे. हे ही बाब विचारात घेण्यासारखी आहे.

त्यामध्ये पुण्यातील PMPML च्या आयुक्त दीपा मुधोल मुंडे हे आहेत. यांना मुलींचा आणि महिलांचा विचार कसा आला नाही. असा देखील काहींमध्ये चर्चा रंगली आहे.

प्रवाशांचा मुद्दा साधा आहे – भाडे वाढवायचं असेल, तर टप्प्याटप्प्याने वाढवा. एका रात्रीत दाम दुप्पट करून सामान्य माणसाच्या जगण्याचा प्रश्न का उभा करता? हळूहळू, वर्षा-दोन वर्षांनी ५-५ रुपयांनी वाढवली असती, तर लोक सहनही केले असते. पण हे निर्णय पुण्याच्या वातानुकूलित कॅबिनेटमध्ये बसून घेतले जातात, ज्यांना रांगेत उभं राहून १० रुपये सुटे देतानाचं आयुष्य कळतच नाही.

PMPML च्या या धोरणामुळे महिला, विद्यार्थी, वृद्ध, कामगार – सगळ्यांच्या जीवनशैलीत गडबड झाली आहे. “दुप्पट भाडे भरून आम्ही अर्धा प्रवासच करू का?” अशी चिडचिड प्रत्येक बसमध्ये ऐकू येतेय.

आज पुणे शहरात काही सोशल मीडियावर #PMPML\_भाडेवाढविरोधात, #माझीबस\_माझा\_हक्क हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. ही फक्त सुरुवात आहे – उद्या विद्यार्थी रस्त्यावर उतरले, महिला संघटना आवाज उठवू लागल्या, तर PMPML चं ‘महत्त्वाकांक्षी’ बजेट लोकशाहीत गुंडाळून फेकलं जाईल.

पुणेकरांना भाडेवाढ नकोय – त्यांना न्याय हवा आहे. PMPML ला हे समजायला हवं. आता भाडे कमी करा, अन्यथा लोकच निर्णय देतील — आणि तो बसच्या ब्रेकइतकाच जोरात लागेल!

भाग 1

क्रमशः

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!