फरासखाना पोलिसांचा संशयास्पद मौन; गाडीतळ चौकीसमोर जुना बाजार येथे अवैध धंदे सुरू असतानाही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा पत्रकाराशी उद्धट संवाद, पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह?
पुणे – फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत, जुना बाजार येथील गाडीतळ पोलीस चौकीसमोरच उघडपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा अधिकृत व्हिडिओ टाईम्स ऑफ महाराष्ट्रने काही दिवसांपूर्वी प्रसारित केला होता. पोलीस चौकीपासून काहीच अंतरावर सुरू असलेला हा बेकायदेशीर कारभार अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनीही दिली होती. या व्हिडिओनंतर पोलिसांकडून तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात मात्र अगदी उलट चित्र दिसून आले.
या प्रकरणावर प्रतिक्रिया घेण्यासाठी टाईम्स ऑफ महाराष्ट्रचे संपादक यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्याशी संपर्क साधला. चौकशीची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी भस्मे यांनी “हा व्हिडिओ जुना आहे, उचलून टाकलेला दिसतोय” असा दावा केला.
संपादकांनी स्पष्ट सांगूनही की हा व्हिडिओ रविवारी म्हणजेच केवळ 3–4 दिवसांपूर्वीचाच आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही पडताळणी करण्याऐवजी संवाद थेट टाळण्याचा प्रयत्न केला.
https://www.instagram.com/reel/DRB01_ZjMv5/?igsh=MWJ6dHpicDFucm90NQ==
इतकंच नव्हे, परस्पर तथ्य न ऐकता भस्मे यांनी वारंवार “फोन ठेवा… फोन ठेवा” असे म्हणत एका जबाबदार पत्रकाराचा फोन उद्धटपणे कट केला.
ही वागणूक केवळ पत्रकारितेचा अपमान नाही, तर पोलीस यंत्रणेच्या पारदर्शकतेवरच मोठा प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे.
महत्वाचं म्हणजे —
जर हा व्हिडिओ खरंच जुना होता, तर त्या काळात त्या अवैध धंद्यांवर काय कारवाई करण्यात आली? कोणाला अटक झाली? चौकशी कोणत्या टप्प्यावर आहे? हे किमान सांगणं तरी अपेक्षित होतं. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मूलभूत प्रश्नांपासूनच पळ काढल्याचं स्पष्ट दिसतं.
यावरून असं प्रश्न निर्माण होत आहेत की —
फरसखाना पोलिस अवैध धंद्यांवर कारवाई करत आहेत की त्यांचीच पाठराखण करत आहेत?
चौकीसमोरच धंदे सुरू राहणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची टाळाटाळी, उद्धट वागणूक — यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संशय निर्माण झाला आहे.
आता या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी आणि जवाबदारीची स्पष्टता गरजेची आहे. कारण प्रश्न फक्त एका व्हिडिओचा नाही… प्रश्न आहे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा, जनतेच्या सुरक्षेचा आणि पोलीस प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा.























