Homeताज्या बातम्यासार्वजनिक बांधकाम मंत्रिपद उदय सामंतांना?

सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद उदय सामंतांना?

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला सार्वजनिक बांधकाम खाते येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना मिळणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगितले जात आहे.
मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवीन कोणती खाती मिळणार याबाबतचे गुढ कायम आहे. भाजपकडे असणार्‍या सार्वजनिक बांधकाम खात्यासह इतर दोन वेगळी खाती शिवसेनेकडे येणार असल्याची चर्चा शिवसेनेमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे उद्योगमंत्री पद यशस्वीरीत्या भूषवलेल्या रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना हे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळणार असल्याचे शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला तेव्हाच आमदार उदय सामंत हेसुद्धा शपथ घेणार या विश्वासाने रत्नागिरीतील शिवसेनेचे अनेक नेते मुंबईतील आझाद मैदानावरच्या शपथविधीला उपस्थित होते. केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर शिवसेनेला सार्वजनिक बांधकाम खात्यासह इतर दोन वेगळी खाती मिळणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ही माहिती रत्नागिरी जिल्ह्यात पसरली असून महत्त्वाचे असे सार्वजनिक बांधकाम खाते उदय सामंत यांनाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी शिवसेनेकडचे उद्योगमंत्रिपद भाजप किंवा राष्ट्रवादीकडे जावू शकणार आहे. वेगळी तीन खाती शिवसेनेकडे न आल्यास यावेळीही शिवसेनेकडेच राहणार्‍या उद्योग मंत्रालयावर उदय सामंत यांचाच दावा असणार असल्याचेही सांगितले जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

error: Content is protected !!