Homeताज्या बातम्याविरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही? राहुल नार्वेकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले...

विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही? राहुल नार्वेकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले…

मुंबई ; लोकशाहीवर विश्वास नाही, म्हणूनच ईव्हीएमविरोधात विरोधक आंदोलन करत आहेत. लोकसभेला ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडणुका झाल्या. त्यावेळेस कुणीही कसलीही तक्रार केली नाही.

राजीनामे दिले नाहीत. आत्ता अचानक आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा कौल आला की, त्याचे खापर निवडणूक आयोगावर फोडायचे. हा केविलवाणा प्रकार सातत्याने विरोधकांकडून होत आहे. मला असे वाटते की, येणाऱ्या काळात आपण संविधानिक संस्थानांवर असे आरोप न करता त्यांवर विश्वास ठेवून संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या आणि जनतेने दिलेला कौल आहे, त्याचा अवमान होऊ नये, याची काळजी सातत्याने घेणे आवश्यक आहे, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून कुणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने नार्वेकर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नार्वेकरांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, असे सांगितले जात आहे. यानंतर राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही?

विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा आणि त्यासंदर्भातील पात्रतेचे निकष काय असावेत, याचे सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांचे असतात. विधानसभा अध्यक्ष अशा प्रकारचे निर्णय घेतात, तेव्हा जुने दाखले, नोंदी, नियमांतील तरतुदी, संविधानात असलेल्या तरतुदींचा विचार केला जातो. मी अद्याप विधानसभेचा अध्यक्ष झालेलो नाही. परंतु, विधानसभा अध्यक्ष झाल्यावर माझ्यासमोर अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यास त्यावर योग्य पद्धतीने विचार करून निर्णय घेऊ, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, २८८ आमदारांना न्याय दिला नाही तर जनतेबरोबर अन्याय होतोय असे वाटेल. संसदीय लोकशाहीसाठी सर्वांना न्याय देणे फार महत्त्वाचे असते. माझ्या कार्यकाळात सर्वाधिक लक्षवेधी मांडल्या गेल्या. अडीच वर्षात सकारात्मक काम झाले आणि त्यादृष्टीने पुढील ५ वर्ष प्रयत्न असेल. नवीन विधान भवनासंदर्भात निर्णय विचाराधीन आहे. कुठल्याही गोष्टीची जबाबदारी दिली जाते तेव्हा मेरीटवर दिली जाते आणि त्यातून माझी निवड झाली आहे, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!