Homeमहाराष्ट्रशिर्डी अधिवेशनात धीरज महांगरे यांची महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी निवड

शिर्डी अधिवेशनात धीरज महांगरे यांची महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी निवड

धीरज महांगरे  (पुणे शहर प्रतिनिधी) : शिर्डी येथे भारत सरकार मान्यताप्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पाचवे राष्ट्रीय अधिवेशन अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडले. देशभरातील पदाधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या अधिवेशनात सामाजिक बांधिलकी, धाडसी पत्रकारिता आणि सातत्यपूर्ण जनहिताच्या कार्याची दखल घेत धीरज रमेश महांगरे यांची महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.

धीरज महांगरे हे नाव केवळ पत्रकार म्हणून नव्हे, तर अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहणारे आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित न ठेवता ती जनहिताची जबाबदारी मानून काम केले आहे.

रस्ते सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षेचे प्रश्न, संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देणे, धोकादायक ठिकाणांची पाहणी करणे, वारंवार पाठपुरावा करणे आणि संबंधित विभागांना तक्रार करून काम कसे होईल यासाठी धडपड करणे ही त्यांची कार्यशैली ठरली आहे. “अपघात घडल्यानंतर आवाज उठवणे सोपे असते, पण अपघात होऊ नये म्हणून आधीच लढणे ही खरी सामाजिक जबाबदारी आहे,” या भूमिकेतून त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

त्यांची काम करण्याची पद्धत अभ्यासू, पुराव्यानिशी मांडणी करणारी आणि तडजोड न करणारी आहे. कोणताही विषय हाताळताना तथ्य, कागदपत्रे आणि कायदेशीर बाजू यांचा सखोल अभ्यास करूनच ते पुढाकार घेतात. दबाव, भीती किंवा राजकीय हस्तक्षेप यांना न जुमानता पारदर्शकता आणि सत्य यांना सर्वोच्च स्थान देणे हा त्यांच्या स्वभावाचा मूलभूत गुण आहे.

संयम, स्पष्टवक्तेपणा, तत्त्वनिष्ठता आणि संघर्षाची तयारी या गुणांच्या बळावर त्यांनी समाजात विश्वासार्हता निर्माण केली आहे. सामान्य नागरिकांची व्यथा ही स्वतःची जबाबदारी समजून ती प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि प्रश्न सुटेपर्यंत चिकाटीने प्रयत्न करणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष मा. संतोषजी निकम, राष्ट्रीय सचिव मा. रमेशजी देसाई तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभवजी पाटील यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.

या नियुक्तीनंतर महाराष्ट्रभर संघटनेची भूमिका अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवणे, पत्रकारितेतील नैतिक मूल्यांना बळ देणे, तरुण पत्रकारांना प्रेरित करणे आणि जनहिताच्या प्रश्नांवर संघटित आवाज निर्माण करणे हा त्यांचा दृढ संकल्प आहे.

धीरज महांगरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,
हे पद माझ्यासाठी सन्मान नसून संघर्षाची नवी जबाबदारी आहे. सामान्य माणसाचा आवाज कधीही दाबला जाऊ नये, अन्यायाविरुद्ध लढा थांबू नये आणि पत्रकारितेची प्रतिष्ठा कायम राहावी यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करीन. पद मोठं नसतं, जबाबदारी मोठी असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!