Homeक्राईमPune Fake IPS : पत्नी आहे पोलीस अधिकारी, परराज्यातही गुन्हा दाखल; IPS...

Pune Fake IPS : पत्नी आहे पोलीस अधिकारी, परराज्यातही गुन्हा दाखल; IPS अधिकाऱ्याचं बिंग फुटलं

Times of Maharashtra Desk, Pune Fake IPS : पुणे पोलीस आयुक्तालयात सागर वाघमोडे नामक तरुणाने प्रवेश करुन विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांना आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले. यावेळी त्याने परिमंडळ १ चे डीसीपी ऋषिकेश रावले आपले बॅचमेट असल्याचे सांगितल्यानंतर अचानाक स्वतः रावले पोलिस आयुक्तालयात आले. भाजीभाकरे यांनी त्यांना संबंधित व्यक्तीबाबत विचारले असता, सागर वाघमोडेबाबत मला माहिती आहे. त्याच्यावर परराज्यात तोतया आयपीएस अधिकारी असल्याचा गुन्हा दाखल आहे, असे त्यांनी सांगितल्यानंतर आयुक्तालयात आयपीएस अधिकारी म्हणून मिरविणाऱ्या तोतयाचे बिंग फुटले.

आयपीएस असल्याचा बनाव करणाऱ्या वाघमोडेची पत्नी मुंबई शहर पोलीस दलात अधिकारी आहे. त्याच्यावर कोतवाली पोलिस ठाणे, हरिद्वार, उत्तराखंड येथे देखील बनावट अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.

काय आहे प्रकरण?

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचा मूळ रहिवासी असलेल्या सागर वाघमोडे याने आपण आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करत शनिवारी सायंकाळच्या सुमारास पुणे पोलीस आयुक्तालयात प्रवेश केला. यावेळी त्याने पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांना आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले. यावेळी वाघमोडेने आयपीएस ऋषिकेश रावले आपले बॅचमेट असल्याचे सांगितले. वाघमोडेने ज्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव घेतले, नेमके तेच आयपीएस अधिकारी त्याच वेळी समोर आले. यामुळे वरिष्ठ उपायुक्तांना वाघमोडेवर संशय आला आणि त्यांनी अधिक चौकशी केली.बोगस अधिकारी असल्याचे स्पष्ट झाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बंडगार्डन पोलिसांना बोलावून घेत सागर वाघमोडेला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी भाविक जितेंद्र शहा (वय ३७, रा. घोरपडी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, बंडगार्डन पोलिसांनी तोतया आयपीएस अधिकारी सागर वाघमोडे (रा. नेरुळ, मुंबई) याला ताब्यात घेतले आहे. फिर्यादी शहा यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. त्याने शहा यांना देखील आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले होते.

पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह ?
पोलीस आयुक्तालयात प्रवेश करताना सामान्य नागरिकांची गेटवर चौकशी केली जाते आणि कामाची विचारणा होते. अशा सुरक्षित ठिकाणी एका व्यक्तीने थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून आपण आयपीएस अधिकारी असल्याचे खोटे सांगण्याचे धाडस केल्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर प्रकरणावर बोलताना बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे म्हणाले- “सागर वाघमोडे नावाची व्यक्ती आपण स्वतः आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून वावरत होती. पोलिस आयुक्तालय परिसरातून त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!