Homeताज्या बातम्यापुण्यातील मेट्रो स्थानकाच्या उभारणीत त्रुटी ; महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केले कबूल...

पुण्यातील मेट्रो स्थानकाच्या उभारणीत त्रुटी ; महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केले कबूल…

पुण्यातील मेट्रो स्थानकाच्या उभारणीत त्रुटी ; महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केले कबूल…

पुणे:- मेट्रो स्थानकांच्या उभारणीतील त्रुटी काही ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या होत्या. यामुळे मेट्रोच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरून शुक्रवारी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यावेळी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी काही त्रुटी असल्याची कबुली देत दुरुस्ती सुरू असल्याचे सांगितले.

दानवे यांनी महामेट्रोच्या कार्यालयाला भेट देऊन मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला. या वेळी महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे उपस्थित होते. या शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यासह इतर नेतेही बैठकीला उपस्थित होते. या वेळी दानवे यांनी पुण्यातील काही ज्येष्ठ अभियंत्यांनी मेट्रो स्थानकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा उल्लेख केला. मेट्रोची सुरक्षितता ही जनतेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असून, त्यात त्रुटी आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावर महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी कामात काही त्रुटी असल्याची कबुली दिली. या त्रुटी सामान्य असून, त्या दूर करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रोच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करणारे सर्व तज्ज्ञ व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर महामेट्रोने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली. तांत्रिक कारणामुळे मेट्रो बंद पडत असल्याचाही मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. या घटना आठवड्यातून एखाद्या वेळी घडत असून, त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

स्थानकांची चर्चा 

मेट्रोच्या स्थानकांना महापुरुषांची नावे देण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली. याचबरोबर शिवाजीनगर स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजीनगर आणि रूबी हॉल स्थानकाचे नाव माता रमाबाई आंबेडकर स्थानक करावे, अशी सूचना त्यांनी केली. यावर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे सांगितले.

“मेट्रो स्थानकांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना महामेट्रोने थातूरमातूर उत्तरे दिली आहेत. त्यांनी आमच्या मुख्य प्रश्नांना बगल दिली आहे. आम्ही अतिशय गंभीर त्रुटी मांडल्या होत्य़ा. त्यांनी आता केलेले दुरुस्तीचे काम अतिशय वरवरचे आहे. त्यांच्याकडून त्रुटी लपविण्य़ाचा प्रयत्न सुरू आहे”, असे हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ यांनी म्हटले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!