Times of Maharashtra Desk : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणूक २०२६ चे वेळापत्रक जाहीर झाले असून, पुणे हे राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक मानले जाते. पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १९ अर्थात कोंढवा खुर्द–कौसरबाग प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून काशीफ सय्यद हे निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुमारे 1 लाखांवर लोकसंख्या असलेल्या या प्रभागात काशीफ सय्यद यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असून, हा प्रभाग त्यांचा बालेकिल्ला ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काशीफ सय्यद हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे शहराचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
कोंढवा खुर्द–कौसरबाग परिसराच्या विकासासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण, वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेले खड्डे बुजवणे, कचरा व्यवस्थापन सुधारणा, तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवणे, ही कामे त्यांच्या कार्यशैलीची ओळख ठरली आहेत. नगरसेवक नसतानाही ते सातत्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जाते.
अलीकडेच कोंढवा भाग्योदय नगर, येथील विद्युत पुरवठ्याचा प्रश्न चर्चेत आला होता. या भागात काही दिवसांपासून एक फेज बंद असल्याने चार दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी पाणीपुरवठाही बंद झाला आणि नागरिकांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागले. वारंवार तक्रारी करूनही शासनस्तरावर दखल घेतली जात नसल्याने नागरिक त्रस्त होते. या प्रकरणात काशीफ सय्यद यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित यंत्रणांशी संपर्क साधत समस्या मार्गी लावली आणि नागरिकांना दिलासा दिला. तसेच काशीफ सय्यद यांनी एक महत्त्वाचा एक काम केलेला आहे, कोंढव्यामध्ये ट्राफिकची समस्या जास्त प्रमाणात जाणवते आणि यावर तोडगा म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या स्वखर्चातुन वॉलेंटियर्स नेमलेले आहेत. त्यामुळे नगरिकान या समस्येला तोंड देणे नक्कीच सोपे झाले आहे.
याशिवाय, काशीफ सय्यद दरवर्षी प्रभागातील 3300 हुन अधिक गरजू कुटुंबांना रेशन वाटप करतात. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरांचे आयोजन, तसेच मैदानी खेळांच्या स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
“जनता प्रथम” हे केवळ ब्रीदवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीतून ते जगत असल्याची भावना नागरिकांमध्ये असून, त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















