Homeताज्या बातम्याPune Municipal Corporation: “सोशल मीडियाचा दबाव आणि विरोधकांच्या षडयंत्रामुळे पूजा मोरे...

Pune Municipal Corporation: “सोशल मीडियाचा दबाव आणि विरोधकांच्या षडयंत्रामुळे पूजा मोरे जाधवची माघार;भावनिक पत्रकार परिषद”

Times of Maharashtra Desk: पुणे महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 2 मधून भाजपच्या उमेदवार पूजा जाधवने माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र टीका झाल्यामुळे पूजा जाधवने अर्ज मागे घेतला. यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन तिने आपली भूमिका स्पष्ट केली.

“विरोधकांनी षडयंत्र रचले आणि त्याची बळी मी ठरलो,” असेही तिने पत्रकार परिषदेत म्हटले. पूजा जाधव म्हणाल्या, “मी स्वतः हिंदू आहे आणि हिंदुत्वासाठी काम करणार आहे. आतापर्यंत झालेल्या चुकांबद्दल माफी मागते. जिथे भाजपला गरज आहे, तिथे मी काम करेन. वाघीण जखमी झाल्यावरही ती अजून अधिक जोमाने काम करते, तसेच मीही करू शकते.”

प्रेस कॉन्फरन्सदरम्यान भावनिक होतानाही पूजा जाधव रडताना दिसल्या. तिने आपल्या संघर्षकाळाबद्दल सांगितले, “माझा जन्म बीडच्या गेवराई तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. वडील ग्रामपंचायतीचे सरपंच होतेच नाहीत. मी शेतकऱ्यांसाठी काम करताना अनेक अडचणींचा सामना केला, पाच गुन्हे दाखल झाले, अनेक तास पोलीस स्टेशनमध्ये घालवले. तरीही संघर्ष करत राहिलो.”

पुढे तिने सांगितले, “छत्रपती संभाजीराजे यांच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करताना माझे आणि माझ्या पतीचे लग्न झाले. लग्नानंतर लगेच प्रभागासाठी काम सुरू केले. शेतकरी आणि कारखानदार यांच्यात संघर्ष करताना अनेक संकटांना सामोरे गेले. पहलगाम आणि काश्मीरच्या घटनांमध्ये धर्म विचारून हल्ले झाले, पण त्या घटना जनता पुढे नीट पोहोचल्या नाहीत. मी पक्षाच्या वरच्या स्तरावर घडलेल्या घटनांची ‘विक्टीम’ ठरलो.”

तिने विरोधकांवरही टीका केली, “सामान्य घरची मुलं उमेदवारी मिळवतात, हे सर्वांना सहन होत नाही. प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची तयारी करताना मला विरोधकांच्या षडयंत्राचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर माझा जीवन आणि कामांचा चुकीचा अर्थ लावला गेला.”

या प्रसंगी तिने आपल्या पती धनंजय जाधवला देखील आभार मानले आणि म्हणाली, “राजकीय आयुष्य आमचं दोघांचं आहे. माझ्यामुळे तुमच्या राजकीय जीवनात अडचण आली असेल, तर माफी मागते.”

धनंजय जाधव यांचे विधान:
“आमच्या दोघांचा विवाह झाला, आमच्या दोघांची पक्षीय भूमिका तुम्ही सर्वांनी पाहिली आहे. माझा संघर्ष टू-व्हीलरपासून इथंपर्यंत आहे. आम्ही प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो. सोशल मीडियाचा बळी माझी पत्नी ठरली आहे. माझ्या पत्नीचे शब्द नव्हते, ते तिच्या तोंडात घातले गेले. आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित ‘आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही’ हा स्टेटमेंट पूजा जाधव हिचा नव्हता.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले, “पहलगामच्या प्रकरणात तिनं काही चुकीचं केले नाही, ती स्वतः त्याची मांडणी करेल. कार्यकर्त्यांच्या निर्णयानुसार काय करता येते, हे आम्ही 2026 च्या पुणे शहरातील निवडणुकीतून दाखवले आहे.”

धनंजय जाधव यांनी प्रभाग क्रमांक 1 संदर्भात सांगितले, “प्रभाग क्रमांक 1 मध्ये तयारी केली, तिथल्या माताबहीनी, भाऊ आलेले आहेत. कोणत्याही पक्षाच्या सर्व्हेत आम्ही प्लस होतो. तिथं जे समीकरण झाली, निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली, त्याचा आम्ही स्वीकार करतो. प्रभाग क्रमांक 1 च्या नागरिकांची, तसेच सुहास चव्हाण व आदिती बाबर यांची माफी मागतो.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!