Homeताज्या बातम्याKDMC BJP-Shiv Sena Alliance : कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीला मोठा दिलासा;...

KDMC BJP-Shiv Sena Alliance : कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीला मोठा दिलासा; 9 उमेदवार बिनविरोध विजयी

Times of Maharashtra Desk: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अर्ज छाननीनंतर भाजप-शिवसेना युतीने कल्याण डोंबिवली महापालिकेत (KDMC) मोठी आघाडी घेतली आहे. 122 सदस्यसंख्या असलेल्या केडीएमसीमध्ये एकूण 9 उमेदवार बिनविरोध विजयी ठरल्याने महायुतीला मतदानापूर्वीच सत्ता स्थापनेच्या दिशेने मोठा पाऊल टाकता आले आहे.

यापैकी भाजपचे 5 आणि शिवसेना (शिंदे गट) चे 4 उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे महायुतीला सत्तेच्या आवश्यक 62 जागांपासून केवळ 53 जागांची दूरवर आहे. भाजपच्या या यशामागे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रणनीती यशस्वी ठरल्याचे दिसते, तर शिवसेनेच्या 4 उमेदवारांच्या बिनविरोध निवडीमुळे खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळी सुद्धा यशस्वी झाली आहे.

भाजपची विजयी घोडदौड
भाजपच्या उमेदवारांमध्ये रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, मन्दा पाटील आणि ज्योती पवन पाटील यांचा समावेश आहे. ज्योती पवन पाटील यांच्या विजयानंतर भाजपाचे एकूण 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

शिवसेनेचा दमदार खेळ
शिवसेनेच्या शिंदे गटानेही आपली ताकद सिद्ध केली. रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी आणि हर्षल राजेश मोरे हे 4 उमेदवार बिनविरोध विजयी ठरले आहेत. सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे ह्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

राज्यात महायुतीच्या बिनविरोध विजयाचा आकडा
राज्यातील इतर महापालिकांमध्येही महायुतीला फायदा झाला आहे. भाजपने धुळे महापालिकेत 2, पनवेल महापालिकेत 1 जागा बिनविरोध मिळवली, तर शिंदे गटाने केडीएमसीत 4 आणि जळगाव महापालिकेत 1 जागा बिनविरोध जिंकली. तसेच, अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या उमेदवाराला एक जागा बिनविरोध मिळाली. त्यामुळे राज्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या एकूण 13 जागा बिनविरोध झाल्या आहेत. भाजप-शिवसेना महायुतीच्या या यशामुळे आगामी मतदानापूर्वीच कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेसाठी महत्त्वाची दिशा निश्चित झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!