Homeताज्या बातम्याPune: पुण्याच्या बुलढाणा अर्बन कार्यालयाचा कारभार उधारच्या कर्मचा-यांवर; राजीनामा नाट्य हे पतसंस्थेत...

Pune: पुण्याच्या बुलढाणा अर्बन कार्यालयाचा कारभार उधारच्या कर्मचा-यांवर; राजीनामा नाट्य हे पतसंस्थेत संभावित मोठ्या भूकंपाची चाहूल

Times of Maharashtra Desk, Pune: हजारो कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेच्या पुणे येथील कार्यालयात काही दिवसांपूर्वी सामूहिक राजीनामानाट्य घडले आणि बँकेत पुन्हा एकदा भूकंप होण्याची चर्चा रंगू लागली आहे. हे राजीनामानाट्य बँकेत भविष्यात येणा-या संभावित मोठ्या भूकंपाची नांदी तर नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. बँकेच्या स्थापनेपासूनच कार्यरत असलेले सीईओ शिरीष देशपांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर बँकेतील सर्वच कर्मचा-यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. त्यामुळे बुलढाण्याहून कर्मचारी आणून बँकेचा कारभार हाकला जात असल्याचे बोलले जात आहे. सध्या पुणे कार्यालयाचे कामकाज हे उधारच्या कर्मचा-यांवर सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकारामुळे बँकेसंदर्भात अनेक चर्चादेखील होऊ लागल्या आहेत.

या संपूर्ण प्रकारात बँकेत ठेवलेल्या ठेवी खरंच सुरक्षित आहेत का, असा सवाल आता अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. रायसोनी किंवा तत्सम पतसंस्थांप्रमाणे बुलढाणा अर्बनदेखील नादारीला तर लागणार नाही ना, अशा विचाराने अनेक ठेवीदार, ग्राहक अस्वस्थ झाले आहेत. बँक प्रशासनाने खरेतर यासंदर्भात शक्य तेव्हढ्या लवकर खुलासा करणे गरजेचे आहे. कारण जास्तच गुप्तता ठेवण्याचा प्रयत्न केल्यास आजवर उभा केलेला डोलारा ढासळण्यास क्षणाचाही विलंब लागणार नाही.

गेल्या सुमारे 35 वर्षांपासून बुलढाणा अर्बन ही महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरदेखील बँकिंग सेवा प्रदान करीत आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी ही पतसंस्था स्थापन केली होती. त्या वेळी त्यांच्यासोबत जर कोणी प्रमुख व्यक्ती असेल तर ती म्हणजे शिरीष देशपांडे. शिरीष देशपांडे हे खरेतर संस्थेच्या पायातील दगड होत. परंतु बँक प्रशासनात गेल्या काही वर्षांपासून सारेकाही आलबेल सुरू आहे, असे म्हणता येणार नाही. अंतर्गत अनेक कुरबुरी बँकेत सुरू होत्या. शिरीष देशपांडे हे मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा अध्यक्ष राधेश्याम चांडक व त्यांच्या कुटुंबीयांचा असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

काही वर्षांपूर्वी बुलढाणा अर्बनमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या बातम्या काही वृत्तपत्र व मीडियामध्ये आल्या होत्या. परंतु प्रत्येक वेळी बुलढाणा अर्बनचे व्यवस्थापन हे वृत्तपत्रांना व्यवस्थित मॅनेज करून आपल्या विरोधात येणा-या बातम्या रोखण्यात यशस्वी झालेले आहे. राधेश्याम चांडक हे मीडिया मॅनेजमेटमध्ये मास्टर असल्याचे अनेक पत्रकार आणि जाणकार बोलून दाखवत असतात. बँकेच्या संदर्भात बातम्या प्रकाशित करणा-या मीडियाच्या म्हणण्यानुसार बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहारांची एक मोठी मालिका घडल्याचे इत्थ्यंभूत वृत्त मीडियामधून प्रकाशित झालेले आहे. बँकेचे ऑडिटदेखील योग्य प्रकारे होत नसल्याचा अनेकांचा निर्वाळा आहे. बँकेच्या व्यवस्थापनात बसलेले काही जण बँकेला वाळवीसारखे पोखरून काढत असल्याचे बोलले जात आहे.

सुमारे 15 वर्षांपूर्वी बँक व्यवस्थापनात जेंव्हा वाद उफाळून आला होता, त्या वेळी तो वाद शमवण्याच्या उद्देशाने संस्थापक चांडक यांनी शिरीष देशपांडे यांना पुण्याला पाठवून त्यांच्याकडे पुणे, पश्चिम महाराष्ट्र परिसराची झूल शिरीष देशपांडे यांच्या खांद्यावर दिली होती. शिरीष देशपांडे यांनी सुरवातीला ती जबाबदारी समर्थपणे आपल्या तळहातावर पेलली खरी, परंतु गेल्या काही महिन्यांपासून शिरीष देशपांडे हे चांडक यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार आणि गैरव्यवहार करीत असल्याची खात्रिलायक माहिती बँकेच्या आतील गोटातूनच आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. डीएसके सारख्या फ्रॉड बिल्डरला पैसे पुरवणे असो की, जैन बोर्डिंग प्रकरणात बँकेची नियमबाह्य कोट्यवधींची गुंतवणूक असो, या प्रत्येक वेळी शिरीष देशपांडे यांचा आगाऊपणा एक दिवस बँकेला गोत्यात आणेल, अशी ठाम धारणा चांडक यांची बनल्याचे त्यांच्याच गोटातून कळते आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून राधेश्याम चांडक यांनी बँकेचे बरेसचे अधिकार हे आपल्या स्वत:कडे एकवटल्याच्या प्रक्रियेमुळेही शिरीष देशपांडे प्रचंड अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे देशपांडे यांच्या गैरप्रकाराने एव्हरेस्टचे टोक गाठल्याने आणि चांडक यांना वारंवार डबल क्रॉस केल्याने अखेर चांडक यांनी शिरीष देशपांडे यांचा काही दिवसांपूर्वी राजीनामा घेतला. परंतु यामुळे बँकेची गैरप्रकारातून सुटका होण्याऐवजी गुंतागुंत आणखी वाढल्याचे बोलले जात आहे. कारण देशपांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर बँकेत सामूहिक राजीनाम्याची मालिका सुरू झाली. पुण्यातील शाखेचे कामकाज ठप्प होण्याच्या कारणाने अखेर मग बुलढाण्याहून काही कर्मचारी पाठवून बँकेचे कामकाज सुरळीत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच सध्या बँकेचे कामकाज हे उधारच्या कर्मचा-यांवर सुरू असल्याचे दिसत आहे. एक अफवा अशीदेखील आहे की, पुणे शाखेत शेकडो कोटींचा गोलमाल झालेला असल्यानेच चांडक हे अॅक्शन मोड वर आल्याचे दिसून येत आहे. आणि त्यातूनच बँकेत सध्या सामूहिक राजीनामानाट्य बोकाळल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

error: Content is protected !!