Homeक्राईमPCMC News: पिंपरी चिंचवड महापालिका ‘ॲक्शन मोड’वर; सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर मोठी...

PCMC News: पिंपरी चिंचवड महापालिका ‘ॲक्शन मोड’वर; सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर मोठी कारवाई; १५ दिवसांत २२८ जणांकडून तब्बल ₹1.27 लाख दंड वसूल…

गणेश नारंग; पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: रहाटणी व श्रीनगर परिसरात सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडवणाऱ्या नागरिकांच्या खिशाला आता चांगलीच कात्री लागत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने मागील पंधरा दिवसांत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करत एकूण २२८ नागरिकांकडून तब्बल ₹1,27,200 इतका दंड आकारला आहे.

स्वच्छता नियमांचे उल्लंघन थेट दंडाकडे नेणार असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाई करत दाखवून दिले आहे. रहाटणी, श्रीनगर, तापकीर चौक, नखाते चौक, रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा तसेच तांबे रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली.

वसूल केलेल्या दंडाची विभागवार माहिती

सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे
२१७ नागरिकांकडून एकूण 91,200 रु. दंड

बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर (पहिला गुन्हा)
प्रत्येकी 5,000 प्रमाणे २ जण – एकूण 10,000 रु. दंड

डास उत्पत्तीस्थाने आढळल्याबद्दल (सोसायटी/हॉटेल/मॉल)
एकूण 10,000 रु. दंड

मोकळ्या जागेत कचरा टाकणे
प्रत्येकी 2,000 प्रमाणे ४ कारवाई – एकूण 8,000 रु. दंड

सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे
5,000 रु. दंड

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
प्रत्येकी 1,000 रु. याप्रमाणे ३ कारवाई – एकूण 3,000 रु.

या मोहिमेत महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे व सहायक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक व कर्मचारी दलाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली. आरोग्य निरीक्षक गणेश राजगे, आरोग्य मुकादम आबा कदम, अरुण राऊत, प्रदीप जगताप, किरण त्रिभुवन, गणेश कार्ले, विशाल यादव, धोंडीबा भालेराव, सागर जाधव, पांडुरंग साठे, अमरदीप जगताप, श्रीकांत कांबळे, संतोष शेरखाने, भारत गायकवाड तसेच डिवाईन स्टाफ यश लोंढे यांचा या मोहिमेत समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!