Homeताज्या बातम्याबारामती विमान दुर्घटनेवरून रोहित पवारांचे गंभीर आरोप; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तपासाची मागणी

बारामती विमान दुर्घटनेवरून रोहित पवारांचे गंभीर आरोप; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तपासाची मागणी

Times Of Maharashtra Desk : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या बारामतीतील विमान दुर्घटनेप्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित करत या घटनेची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी दिल्लीतही माध्यमांशी संवाद साधत अपघातामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले.

रोहित पवार यांनी सांगितले की, अजित पवार जर विमानाऐवजी रस्त्याने प्रवास केला असता तर ही दुर्दैवी घटना टळली असती. दुर्घटनेपूर्वी काही घडामोडी संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित फाईल मुद्दाम आणली गेली का, फाईलवर स्वाक्षरी झाल्यानंतर सायंकाळी ७.१३ वाजता विमानाचे बुकिंग का झाले, याची चौकशी व्हावी, असे ते म्हणाले. आपण कोणावर थेट आरोप करत नसून सत्य बाहेर यावे हीच भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी शेकडो कोटींच्या कंत्राटावरून वाद झाल्याचा गौप्यस्फोट केला. एका पॉलिटिकल कन्सल्टंटचे कंत्राट रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती, त्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यामुळे उशीर झाल्याचा दावा त्यांनी केला. बारामतीत नरेश अरोरा यांच्या कंत्राटासंदर्भातही मतभेद होते, असे सांगत काही वरिष्ठ नेत्यांनी ते कंत्राट कायम ठेवण्याचा आग्रह धरला होता, असा आरोप त्यांनी केला. अप्रत्यक्षपणे त्यांनी सुनील तटकरे यांच्याकडे बोट दाखवले.

प्रमोद हिंदुराव यांच्या व्हिडिओचाही उल्लेख करत रोहित पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांच्या फोनमुळे फाईल आणण्यात उशीर झाल्याचे सांगितले गेले. काही नेते अजित पवार यांच्या बाजूने बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री व नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची भेट न मिळाल्याचे सांगत त्यांनी ई-मेलद्वारे पत्र पाठविणार असल्याचे स्पष्ट केले. ब्लॅक बॉक्समधील नोंदींबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी करत ही घटना अपघात की घातपात” याचा पारदर्शक आणि क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनद्वारे तपास व्हावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. डीजीसीएचा तपास सुरू असला तरी एका महिन्यात आंतरराष्ट्रीय यंत्रणेमार्फत स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!