Homeक्राईमSantosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू; आरोप निश्चितीची...

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू; आरोप निश्चितीची शक्यता, बचाव व सरकारी पक्षात जोरदार युक्तिवाद

Times of Maharashtra Desk: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीड जिल्हा न्यायालयात सुरू झाली. सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरुवात झाली असून, सरकारी पक्षातर्फे सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी प्रारंभिक युक्तिवाद केला. या सुनावणीसाठी मयत संतोष देशमुख यांचे नातेवाईक धनंजय देशमुख न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणात आज आरोपींवर आरोप निश्चित (चार्ज फ्रेम) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, या प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले हा वैद्यकीय कारणास्तव प्रत्यक्ष सुनावणीस अनुपस्थित असून, वाल्मीक कराडसह इतर आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर राहिले.

उज्वल निकम यांना बाजूला करण्याची मागणी
सुनावणीदरम्यान, वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप करत, त्यांना या प्रकरणातून बाजूला करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला.या अर्जाची माहिती न्यायालयाने उज्वल निकम यांना दिल्यानंतर, त्यांनी हा अर्ज फेटाळण्याची मागणी करत आपले म्हणणे मांडले.

विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी
आरोपी क्रमांक दोन विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावरही आज युक्तिवाद झाला. चाटे यांच्या वकिलांनी सांगितले की, सुरुवातीच्या दोन एफआयआरमध्ये विष्णू चाटे यांचे नाव नाही, तसेच यापूर्वी त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.
मात्र, सरकारी पक्षाच्या वकिलांनी याला विरोध करत, आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार खंडणीची मागणी करण्यात आली असल्याचा दावा केला. विष्णू चाटे हे सुरुवातीपासूनच या गुन्ह्यात सक्रिय असल्याचेही सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

न्यायालयात गोंधळ; आरोपी घुले चक्कर येऊन पडला
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपी सुदर्शन घुले याचे नाव पुकारताच, तो अचानक चक्कर येऊन खाली पडल्याची घटना घडली. यानंतर आरोपींच्या वकिलांनी, घटनेशी संबंधित सर्व व्हिडिओ आरोपी पक्षाला उपलब्ध करून द्यावेत, त्यानंतरच आरोप निश्चिती करण्यात यावी, अशी मागणी केली.
“जे व्हिडिओ ट्रायल कोर्टात दाखवले जात नाहीत, ते उच्च न्यायालयात दाखवून वातावरण भावनिक केले जाते,” असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.

व्हिडिओ पुराव्यांवर अर्धा तास चर्चा
लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हमधील व्हिडिओ पुराव्यांवर सुमारे अर्धा तास युक्तिवाद झाला. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयास सांगितले की, आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोबाईलमधील डेटा लॅपटॉपमध्ये कॉपी करून मोबाईलमधील सर्व डेटा डिलिट केला आहे. सरकारी पक्षाकडून आजच आरोपींच्या वकिलांना संबंधित व्हिडिओ फाइल्स देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

सध्या या प्रकरणात अद्याप आरोप निश्चिती झालेली नसून, पुढील सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

error: Content is protected !!