Homeक्राईमmanikrao kokate : नाशिक शासकीय सदनिका घोटाळा : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला...

manikrao kokate : नाशिक शासकीय सदनिका घोटाळा : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्याची उच्च न्यायालयात मागणी

Times of Maharashtra Desk: नाशिक येथील शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी अद्यापही संपलेल्या नाहीत. सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली.

दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या शासकीय सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याचा ठपका कोकाटेंवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला, तरी अटकेची भीती आणि आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता कायम आहे. या पार्श्वभूमीवर सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा स्थगित ठेवावी, अशी मागणी कोकाटेंनी उच्च न्यायालयात केली आहे.

1989 च्या अर्जावेळी उत्पन्न फक्त 2,500 रुपये – बचाव पक्षाचा दावा

कोकाटेंच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. रवी कदम यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयासमोर 1989 साली घरासाठी करण्यात आलेल्या अर्जाची प्रत सादर केली. हा अर्ज दुर्बल घटक (वीकर सेक्शन) योजनेअंतर्गत करण्यात आला होता.“अर्जाच्या वेळी सप्टेंबर 1988 ते सप्टेंबर 1989 या कालावधीतील उत्पन्न दाखवणे आवश्यक होते. त्या काळात कोकाटेंचे मासिक उत्पन्न केवळ 2,500 रुपये होते. म्हणजेच वार्षिक उत्पन्न 30 हजार रुपयांपेक्षा कमी होते. त्यामुळे नियमांनुसार ते पूर्णतः पात्र होते,” असा दावा अ‍ॅड. कदम यांनी केला.

उत्पन्न वाढल्यानंतर घर परत करण्याचा नियम नाही
बचाव पक्षाने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. “एखाद्याला घर मिळाल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली किंवा उत्पन्न वाढले, तरी घर परत करण्याचे कोणतेही प्रावधान कायद्यात नाही. आर्थिक परिस्थिती कालांतराने बदलत असते,” असे अ‍ॅड. कदम यांनी स्पष्ट केले.1993-94 मध्ये कोकाटेंचे वार्षिक उत्पन्न 35 हजार रुपये झाल्याचे मान्य करतानाही त्यांनी सांगितले की, “कायदेशीरदृष्ट्या अर्जाच्या वेळी असलेले उत्पन्नच महत्त्वाचे असते.”

सत्र न्यायालयाचा निकाल ‘अंदाजावर’ आधारित – आरोप
सत्र न्यायालयाच्या निकालावर आक्षेप घेताना अ‍ॅड. कदम म्हणाले, “निकालात कोकाटेंच्या वार्षिक उत्पन्नाबाबत केवळ अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्जाच्या वेळी उत्पन्न 35 हजारांपेक्षा जास्त होते, हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची होती.” तसेच 1989 ते 1994 या कालावधीतील उत्पन्न ग्राह्य धरण्याचा कोणताही कायदेशीर आधार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

फोर्जरीचा आरोप चुकीचा असल्याचा दावा
या प्रकरणात कोकाटेंना भारतीय दंड संहितेच्या कलम 463 अंतर्गत फोर्जरीसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र हा आरोपही चुकीचा असल्याचा दावा बचाव पक्षाने केला.“ज्या कागदपत्रांवर फोर्जरीचा आरोप आहे, त्यावरील सह्या कोकाटेंच्याच आहेत. कोणी स्वतःच्या सहीची फोर्जरी कशी करू शकतो? माहिती चुकीची असू शकते, मात्र त्यामुळे तो गुन्हा फोर्जरी ठरत नाही,” असा ठाम युक्तिवाद अ‍ॅड. रवी कदम यांनी न्यायालयात मांडला.
दरम्यान, या प्रकरणावरील पुढील सुनावणी आणि उच्च न्यायालयाचा निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!