Homeमनोरंजनकॉमेडीयन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी दुसऱ्या बाळाचं आगमन

कॉमेडीयन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी दुसऱ्या बाळाचं आगमन

Times of Maharashtra Desk: सुप्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंह आणि लेखक-दिग्दर्शक हर्ष लिंबाचिया यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. शुक्रवारी, 19 डिसेंबर रोजी, भारती सिंहने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारतीने गोंडस मुलाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे, भारती शूटमध्ये व्यस्त असतानाच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर सेटवरील सहकाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी तिचा पती हर्ष लिंबाचिया तिच्यासोबत उपस्थित होता. सध्या आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचं सांगितलं जात आहे.

शूटदरम्यान सुरू झाल्या प्रसूती वेदना
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळपासून भारती सिंह शूटमध्ये बिझी होती. त्याच दरम्यान तिला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत सेटवरील टीमने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. काही वेळातच भारतीने गोंडस मुलाला जन्म दिला.

‘गोला’ झाला मोठा दादा
भारती आणि हर्ष यांना आधीपासूनच एक मुलगा आहे. 2022 मध्ये जन्मलेल्या त्यांच्या मुलाचं नाव लक्ष्य असून, तो सर्वांचा लाडका ‘गोला’ म्हणून ओळखला जातो. आता गोलाने मोठ्या दादाची भूमिका स्वीकारली आहे. या आनंदाच्या क्षणावर चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

41व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म
41व्या वर्षी भारती सिंहने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. भारती आणि हर्ष यांचा विवाह 2017 मध्ये झाला होता. ऑक्टोबर महिन्यात या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुसऱ्या गर्भधारणेची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

प्रेग्नंसीदरम्यान शेअर केले खास क्षण
गर्भधारणेच्या काळात भारती आणि हर्षने अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. रोमँटिक फोटोमध्ये भारती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती. याशिवाय, वेबी शॉवर आणि मॅटरनिटी फोटोशूटचे फोटोही या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.दरम्यान, भारती आणि हर्ष यांच्या घरी दुसऱ्या बाळाच्या आगमनाने चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!