Homeक्राईमSushma Andhare Eknath Shinde साताऱ्यातील ड्रग्ज कारवाईत ४५ किलो सापडले; सुषमा...

Sushma Andhare Eknath Shinde साताऱ्यातील ड्रग्ज कारवाईत ४५ किलो सापडले; सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा हवा’

Times of Maharashtra Desk: सातारा जावळी तालुक्यातील सावरी गावातील एका रिसॉर्टमध्ये पोलिसांनी ४५ किलो ड्रग्ज सापडल्याचा खुलासा झाला आहे. या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत सुमारे १४५ कोटी रुपये असल्याचे आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.
सुषमा अंधारे यांनी सांगितले की, हा रिसॉर्ट प्रकाश शिंदे याच्या मालकीचा आहे. प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असून त्यांनी २०१७ साली ठाण्यातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती.

सुषमा अंधारे यांनी पोलिसांवरही सवाल उठवला. त्यांच्या मते, पोलिसांनी कारवाई केली असली तरी ड्रग्जशी संबंधित तिन्ही व्यक्तींची नावे FIR मध्ये नमूद नाहीत. तसेच, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या प्रकरणाची माहिती लपवून ठेवली असल्याचा आरोपही त्यांनी केला.सुषमा अंधारे म्हणाल्या, “एखाद्या प्रकरणात पोराचं नाव आलं तर बापाचा राजीनामा मागितला जातो. मग ड्रग्ज प्रकरणात भावाचे नाव आल्यास एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा आवश्यक आहे.” याशिवाय, त्या म्हणाल्या की, “माझ्या जीवाला धोका निर्माण झाला, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी.”

सुषमा अंधारे यांनी तपशीलवार माहिती देताना सांगितले की, १३ डिसेंबर रोजी सावरी गावातील रिसॉर्टमध्ये पोलिसांची कारवाई झाली. या ठिकाणी स्विमिंग टँक, सात-आठ रूमसह अनेक सुविधा असलेले रिसॉर्ट आहे. शेडचे मालक गोविंद सिंदकर असून, त्याची चावी ओंकार दिघे यांनी घेतली होती. पोलिसांनी ओंकार दिघे याला ताब्यात घेतले आणि नंतर सोडले, ज्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही.स्थानिकांच्या मते, त्या ठिकाणी राहणारे तिन्ही लोक भारतीय नसावेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या हॉटेलमधून होत होती. सुषमा अंधारे यांनी या तिन्ही लोकांची नावे FIR मध्ये का नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे.

सुषमा अंधारे यांच्या मते, या प्रकरणातून प्रकाश शिंदे आणि एकनाथ शिंदे गटाशी संबंधित अनेक राजकीय प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांनी सांगितले की, या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली असून, संबंधित व्यक्ती जबाबदार धरले जाणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!