Homeमहाराष्ट्रकोंढव्यात शोएब खान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ; कार्यक्रमानिमित्त वरिष्ठ...

कोंढव्यात शोएब खान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ; कार्यक्रमानिमित्त वरिष्ठ नेत्यांनी हजेरी…

कोंढव्यात शोएब खान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ; कार्यक्रमानिमित्त वरिष्ठ नेत्यांनी हजेरी…

कोंढवा – प्रभाग अध्यक्ष-19 (कोंढवा-कौसरबाग) शोएब खान यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम राबवत 1000 हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य (स्टेशनरी किट) वाटप केले. कोंढवा येथील वेलकम हॉल, कौसरबाग रोड येथे झालेल्या या उपक्रमास स्थानिक नागरिक, विद्यार्थी व पालकांचा अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला.

विशेष म्हणजे, वाढदिवसानिमित्त मोठा खर्च न करता तो संपूर्ण निधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी वापरला, ही बाब उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरली.

या कार्यक्रमाला काँग्रेस कमिटी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमीर शेख, हडपसर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष दिलीप तुपे, साहिल केदारी, देविदास लोणकर, नूर शेख, इम्तियाज शेख, मझर मणियार, भूषण रानभारे, अस्मा खान, शाकिर भंगारवाला, माया ढोरे, अल्ताफ शेख, सुलतान सर, अकबर शेख, कांचन ताई, नाझीया शेख यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, “शोएब खान यांसारखे कार्यकर्ते समाजकार्यात नेहमी आघाडीवर असतात. अशा कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांत नक्कीच संधी मिळाली पाहिजे.” तसेच दिलीप तुपे यांनीही शोएब खान यांना निवडणूक संधी मिळावी यासाठी आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांत उत्स्फूर्त वातावरण होते. स्वतः शोएब खान यांनी बोलताना सांगितले की, “विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी छोटे का होईना, पण समाजहिताचे उपक्रम करत राहणे हीच खरी समाधानाची बाब आहे. जर पक्षाने आगामी निवडणुकीत संधी दिली तर आम्हीही त्यासाठी सज्ज आहोत.”

शोएब खान यांनी यापूर्वीदेखील विविध सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेतली असून नुकतेच कोंढव्यातील विजेच्या समस्येबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

राजकीय चर्चेत आता हेही अधोरेखित होत आहे की कोंढव्यात आधीच तीन मुस्लिम नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत जर शोएब खान यांनी निवडणुकीसाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला, तर याचा थेट परिणाम विद्यमान समीकरणांवर होऊ शकतो आणि इतर उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमाचे आयोजन सिकंदर सय्यद व समता युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

पूरग्रस्त गोदाकाठचे पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)   गोदाकाठमध्ये पुरामुळे सर्वच शेतकरी व सायखेडा, चांदोरीतील दुकानदारांचे तसेच रहिवासी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे...

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

error: Content is protected !!