Homeताज्या बातम्याप्रभाग २२ मधून शानूर रशीद शेख यांना नागरिकांचा भरघोस पाठिंबा; पारदर्शक, कार्यशील...

प्रभाग २२ मधून शानूर रशीद शेख यांना नागरिकांचा भरघोस पाठिंबा; पारदर्शक, कार्यशील आणि विश्वासार्ह नेतृत्वाला जनतेची पसंती…

Times of Maharashtra Desk, Pune: पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मध्ये येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, या प्रभागात शानूर रशीद शेख यांना नागरिकांचा उत्स्फूर्त आणि भरघोस पाठिंबा मिळताना दिसत आहे. शांत, संयमी आणि पारदर्शक प्रतिमेमुळे शानूर शेख हे अल्पावधीतच प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचे विश्वासार्ह नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत.

शानूर रशीद शेख हे माजी नगरसेवक व पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ नेते रशीद शेख यांचे चिरंजीव आहेत. राजकारणासोबतच सामाजिक कार्याची भक्कम परंपरा लाभलेल्या या कुटुंबाचा पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात दीर्घकाळापासून ठसा आहे. गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून रशीद शेख हे पुणे शहरातच नव्हे तर राज्यभरात मुस्लिम समाजात एक प्रतिष्ठित, विश्वासार्ह आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

शानूर शेख यांनीही हीच सामाजिक बांधिलकी पुढे नेत गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांपासून ते मूलभूत सुविधांपर्यंत, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी केलेली कामे आज प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहेत. कोणताही गाजावाजा न करता प्रत्यक्ष कामावर भर देणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक २२ मध्ये रशीद शेख यांना मानणारा आणि विश्वास ठेवणारा मोठा वर्ग आजही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. हाच विश्वास आता शानूर रशीद शेख यांच्याकडे स्वाभाविकपणे वळताना दिसत असून, “नावापेक्षा काम महत्त्वाचे” या भूमिकेने ते नागरिकांच्या मनात स्थान मिळवत आहेत.

पारदर्शक कारभार, सर्वसमावेशक विचारसरणी आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची शैली यामुळे शानूर रशीद शेख हे केवळ उमेदवार म्हणून नव्हे, तर भविष्यातील सक्षम आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून पाहिले जात आहेत. प्रभाग २२ मधील वाढता जनसमर्थन पाहता, येत्या काळात पुण्याच्या स्थानिक राजकारणात शानूर रशीद शेख हे एक प्रभावी आणि सकारात्मक नेतृत्व म्हणून उदयास येतील, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!