शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक 18-07-2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय शिरपूर व 49 महाराष्ट्र बटालियन NCC,अमळनेर यांच्या विद्यमाने शिरपूर येथील शहीद स्मारक ला अभिवादन करून शिरपूर येथील बोराडी गावाचे स्वातंत्र्यसैनिक शिक्षण महर्षी, कर्मवीर अण्णाबाबा व्यंकटरावजी रणधीर व भारत देशासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी व देशाच्या भारतीय सेनेतील जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व शहिदांना NCC कॅडेट्स व व शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सौ संगीता ताई देवरे नगरसेविका श्रीमती वर्षा माळी, शिरपूर वरवडे नगरपालिकेच्या आरोग्य सभापती डॉ. वृषाली बडगुजर, नगरसेविका डॉ.अमृता महाजन , शिरपूर शहरातील सुप्रसिद्ध डॉ. अतुलजी बडगुजर असे प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत अभिवादन करून पुष्प चक्र अर्पण करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसो श्री एस जे कुवर सर, उपमुख्याध्यापक बापूसो के डी बच्छाव सर, संस्थेचे लेखापाल दादासो प्रवीण पाटील ज्येष्ठ शिक्षक आर एम बारी सर विद्यालयाचे एनसीसी प्रमुख श्री संदीप सोनवणे सर, श्री बोरसे सर, श्री महाजन सर, श्री जे एस राऊळ सर, विद्यालयाचे ग्रंथपाल श्री सगळे भाऊसाहेब,श्री राजपूत सर श्री शिंदे सर, श्री पटेल सर, श्री गिरीश पाटील सर, श्री विभूषण पाटील सर ,श्रीमती गिरासे मॅडम, श्रीमती सोनवणे मॅडम, श्रीमती अहिरे मॅडम , श्री खैरनार मॅडम, श्रीमती कासार मॅडम, श्रीमती राजपूत मॅडम, शेख सानिया मॅडम व इतर शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी वीर शहीद जवानांना अभिवादन करून व त्यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. या अदरांजलीच्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन विद्यालयाचे एनसीसी प्रमुख आदरणीय सोनवणे सर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






















