Homeमहत्त्वाचे“Nitesh Rane launches an attack over the alliance dispute in Sindhudurg.“सिंधुदुर्गातील युती...

“Nitesh Rane launches an attack over the alliance dispute in Sindhudurg.“सिंधुदुर्गातील युती वादावर नितेश राणेंचा हल्लाबोल; नीलेश राणे बळीचा बकरा?”

Times of Maharashtra Desk, : सिंधुदुर्गमध्ये शिंदे आणि बीजेपी युती वाद कही दिवसांपासून सुरू आहे. यामुळे काही दिवसांपासून नितीश राणे आणि नीलेश राणे यांच्यामध्ये मतभेद देखील होत होते. तसेच भाजप नेते नारायण राणे यांना संपवण्याचा कट सुरु आहे. राणे साहेब तुम्हाला प्रचारात कुठे दिसतात का?. नारायण राणे यांना युती हवी होती. पण त्यांचा शब्द मानला नाही” असा दावा दीपक केसरकर यांनी केला होता. यावर प्रतीक्रिया व्यक्त करत मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. ते म्हणाले नारायण राणे यांची इच्छा होती, जिल्ह्यामध्ये युती व्हावी, रत्नागिरीमध्ये युती झाली पण सिंधुदुर्गमध्ये युती होऊ शकली नाही, विरोधक असेही म्हणत आहेत नारायण राणे यांचा शब्द मानला गेला नाही, यावर मी इतकंच बोलेन नारायण राणे यांची इच्छा होती की शहर विकास आघाडी होऊ नये, कणकवलीत शहर विकास आघाडी होऊ नये, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये, हे विधान देखील नारायण राणे यांचं होतं, शेवटी नारायण राणे हे एक प्रगल्भ नेते आहेत, त्यांना युती आघाड्या सर्व समजतं, ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांना राज्य कसं चालवायचं, कशा युती, आघाडी होतात, हे सर्व आयुष्यभर अतिशय बारकाईने त्यांनी पाहिलेलं आहे, म्हणून प्रस्ताव आले गेले, टेबलावर नेमकं काय झालं? याची माहिती त्यांना असते, असं नितेश राणे यांनी सांगितल.

तर पुढे ते अस देखील म्हणाले की नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत तसेच अतिशय उत्तम संवाद नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देखील आहे, म्हणून त्या लोकांना माहिती आहे, काय विषय आहे तो, त्यामुळे त्यांना युतीबाबत सर्व परिस्थिती माहिती आहे, युती कशी होते वगैरे, काय मागण्या केल्या सर्व माहिती टेबलावर मिळालेली आहे. आता आपल्याला फक्त एक चुकीचं चित्र दिलं जातं, आम्ही सगळेच द्यायला तयार होतं, ते नगरअध्यक्ष पद मागत होते, भाजपाकडून त्यांच्या हक्काचं नगराध्यक्ष पद मागत होते, आम्ही त्याबद्दल काही बोललो नाही, गप्प होतो, इतका वेळ, कारण आम्हाला माहिती आहे की विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही.

निलेश राणे यांचा देखील बळीचा बकरा केला जात आहे, त्यांना एकटं पाडलं जात आहेनितीश राणे

प्रतीक्रिया व्यक्त करताना नितीश राणे यांनी दीपक केसारकरांवर अनेक प्रश्न उठवले आहेत. ते म्हणाले २०१९ पासून मल्टी स्पेशालिस्टची जागा जी क्लियर झालेली, तरीपण केसरकारांना का जमलं नाही जागा भरून देणं? आरोग्यवस्थेबद्दल सावंतवाडी आणि वेंगुर्लेचे लोक आजही बोंब का मारत आहेत. दीपक केसरकर आमदार आहेत ना, मंत्री झालेले आहेत, केसरकरांनी याबद्दल उत्तर दिले पाहिजे, आरोग्याची व्यवस्था का केली नाही? डॉक्टर का दिला नाही? का इथल्या लोकांना आरोग्यासाठी गोव्याला जावे लागत आहे? जर त्यांच्या कडे याच उत्तर नसेल तर त्यांनी याच्यामध्ये उगाच कोणी राजकारण करू नये, आमच्या रवींद्र चव्हाण यांच्यावरती कोणीही आरोप करू नये, रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये काय केलं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, आमच्यासाठी विधानसभेला काय केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे, निलेश राणे यांचा देखील बळीचा बकरा केला जात आहे, त्यांना एकटं पाडलं जात आहे, का दुसरा कोणता शिवसेनेचा नेता बोलत नाही, का बोलत नाही, उदय सामंत येऊन रवींद्र चव्हाणांवरती का टीका करत नाहीत, निलेश राणे यांच्या समर्थनार्थ त्यांच्यातील एकही नेता का उतरत नाही? तिकडे ते गुलाबराव पाटील राज्यातल्या कुठल्यातरी एका जिल्ह्यातल्या कुठल्यातरी एका शहराच्या नगरपालिकेसाठी नारायण राणेंची कशी खिल्ली उडवत आहे ते दाखवू का व्हिडिओ? मग बाकी कोण का बोलत नाहीत, फक्त निलेश राणेच बोलत आहेत, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला, त्यांना काय पाडला जात आहे, दीपक केसरकर का रवींद्र चव्हाण यांचे नाव घेत नाहीत, या बाबतीमध्ये दोन तारखेनंतर जसं निलेश राणे बोलले आहेत, फडणवीसांसोबत बसून, रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बसू महायुती मधून यातून काय मार्ग निघतो ते पाहू अस म्हणत नितीश राणे यांनी आपला भाऊ नीलेश राणे यांची बाजू घेतली आहे. आता हे भावभवा मधील राजकारण अजून कोणते वळण घेणार असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!