Homeताज्या बातम्याMaharashtra Elections: एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाची बेरीज ५० टक्क्यांवर नकोच; सर्वोच्च...

Maharashtra Elections: एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाची बेरीज ५० टक्क्यांवर नकोच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Times of Maharashtra Desk, Pune: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांच्या पुढे जाता कामा नये, असा स्पष्ट आणि महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला दिले आहेत.

काय आहे निर्णय?

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) यांचे एकत्र केलेले आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक असू नये. राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही ५०% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचे समोर आले होते. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या २४२ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ५७ संस्थांमध्ये आरक्षणाची कमाल मर्यादा ओलांडली गेल्याची माहिती निवडणूक आयोगाने कोर्टात दिली होती. त्यावर, सरन्यायाधीशांनी तोंडी टिप्पणी केली की, या ५७ संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण या प्रकरणाच्या अंतिम निकालावर अवलंबून असेल. कोर्टाने स्पष्ट केले आहे की, यापुढे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करताना ५० टक्क्यांच्या आरक्षणाच्या मर्यादेचे पूर्णपणे पालन करणे अनिवार्य आहे.

या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी तसेच सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या ५०% मर्यादेचे उल्लंघन होत असलेल्या जागांवर निकालाच्या अधीन राहून निवडणुका पार पडतील.

21 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आम्ही तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करु असं सांगितलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!