Homeताज्या बातम्यापत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही...

पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, “मी काही ज्योतिष नाही…”! नेमकं काय घढलं?

हाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाल्यानंतर, आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात दिल्लीतमहायुतीतील काही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, हेदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना मुख्यमंत्री पदासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किलपणे ‘मी काही ज्योतिष नाही’, असे उत्तर दिले.

काय म्हणाले अजित दादा? –

अजित दादांना मुख्यमंत्री म्हणून बघायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणखी पाच वर्षे वाटावे लागेल का? असा प्रश्न विचारला असता, “मी काही ज्योतिषी नाही. यासंदर्भात आज रात्री आमची चर्चा होईल. आम्ही देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे आमचे लक्ष आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत, असे अजित पवार म्हणाले.

अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतले जाणार आहे का, असा काही फॉर्म्युला आहे का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, “अरे राज्याचे सरकार आहे. १३-१४ कोटी लोकांचे नेतृत्व करायचे आहे. आम्ही एका विचाराने पुढे चाललो आहोत. आमचे ध्येय राज्याचा सर्वांगीण विकास करणे आहे. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. याच बरोबर, पूर्वीच्या योजनां कशा व्यवस्थित चाललीत आणि आश्वासनांची पूर्तता कशी होईल? हे आमचे पहिले लक्ष आहे.”

तुमच्या पक्षाला केंद्रात मंत्रीपद मिळेल का? असे विचारले असता, “यासंदर्भात मी बैठकीत ठरवेन, काय बोलायचे ते. आता तुम्हाला कशाला सांगू? काय बोलायचे, तो आमचा अधिकार आहे. तेवढं तरी आम्हाला ठरवू द्या,” असे अजित पवार म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!